श्रीगणेश चतुर्थी-माहिती-9

Started by Atul Kaviraje, September 19, 2023, 11:01:14 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                     "श्रीगणेश चतुर्थी"
                                    ----------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१९.०९.२०२३-मंगळवार आहे. आज "श्रीगणेश चतुर्थी" आहे. गणेश चतुर्थी हा सण देशातील विविध राज्यांमध्ये साजरा केला जातो. तथापि, हा सण सगळ्या जास्त महाराष्ट्रात साजरा केला जातो. गणेश चतुर्थी हा हिंदूंचा एक अतिशय महत्त्वाचा सण आहे, जो दरवर्षी भाविक मोठ्या जोशाने आणि उत्साहाने साजरा करतात. हिंदू मान्यतेनुसार, गणेश चतुर्थी दरवर्षी भगवान गणेशाच्या वाढदिवस म्हणून साजरा केला जातो. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी, कवी-कवियत्रींना गणेश चतुर्थीच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया गणेश चतुर्थीवर महत्त्वाची माहिती.

               श्री गणेश पूजन--

     पुढील पायरीमध्ये 16 चरण पूजेची म्हणजेच षोडशोपचार परंपरा समाविष्ट आहे ज्यात संस्कृतमध्ये 'षोडशा' म्हणजे 16 आणि उपचारा म्हणजे 'श्रद्धेने देवाला अर्पण करणे.

श्री गणेशाला फुलांची माळ घालावी.

त्यानंतर नवीन वस्त्र/वस्त्रे अर्पण करावी. (वस्त्र, उत्तरीय समर्पण)

नंतर गणपतीच्या मूर्तीला चंदन, हळद, कुंकू, गुलाल लावून घ्यावा.

गणपतीच्या मूर्तीला फुले वाहावीत.

गौरी आणि गणपतीच्या मूर्तीला लाल वस्त्रे वाहवित.

फुलांसह, अखंड तांदूळ (अक्षता), हार, सिंदूर आणि चंदन. मूर्तीला मोदक, सुपारीची पाने, नारळ (नैवेद्य) अगरबत्ती, दिवे, स्तोत्र, मंत्रजप देऊन धार्मिक रीतीने सजवावे.

गणपतीच्या मूर्तीला मिठाई, मोदकांचा तसेच पंचामृताचा नैवेद्य दाखवावा.

त्यानंतर मूर्ती समोर अगरबत्ती लावावी.

गणपती मूर्तीच्या बाजूला गौरीची मूर्ती एका कलशामध्ये स्थापन करून घ्यावी. त्यानंतर तिला हळद-कुंकू वाहून फुले वहावित.

त्यानंतर गौरीच्या मूर्तीला देखील निरांजन आणि अगरबत्तीने ओवाळून घ्यावे. त्यानंतर गणपतीला देखील निरांजनाने आणि अगरबत्तीने ओवाळून घ्यावे.

"ओम गं गणपतये नमः" मंत्राने पूजा सुरू करा.

गणपतीच्या मंत्रोच्चाराने यथासांग पूजा करावी.

गणपतीला धूप दाखवून संपूर्ण घरामध्ये धुपारती करावी.

विनायक कथा, गणेश स्तोत्र आणि गणेश अथर्वशीर्ष चा जप करा.

त्यानंतर गणपतीची कापूर लावून आरती करावी.

निरंजन आरती, पुष्पांजली अर्पण, प्रदक्षिणा या चरणांचा क्रम आहे.

पहिल्या दिवशी गणपतीच्या आवडीचे मोदक यांचा तसेच पंचपक्वानांचा नैवेद्य दाखवावा.

हे दिवस अत्यंत शुभ आणि पवित्र मानले जातात त्यामुळे ज्यांना घरी गणपती आणता येत नाही ते मंदिरात जाऊन गणपतीला लाडू आणि दुर्वा अर्पण करून प्रार्थना करू शकतात.

              उत्तरपूजा विधी--

     ज्याप्रमाणे आपण गणेश चतुर्थी या दिवशी गणेशाची स्थापना करून पूजा करतो, त्याच पद्धतीने गणपतीची विसर्जन पूजा देखील केली जाते. शास्त्रशुद्ध पद्धतीने गणपतीची पूजाअर्चा करून विसर्जन केल्यामुळे घरामध्ये सुख, शांती, समृद्धी, समाधान लाभते.

सर्वप्रथम गणपतीला फुलांचा हार घालावा. त्यानंतर हळद, कुंकू, अक्षता वाहून घ्याव्यात.

त्यानंतर लाल वस्त्र वहावीत. गणपतीला आवडणाऱ्या दुर्वा, जास्वंदीची फुले वहावीत.

यानंतर अगरबत्ती लावावी. आणि घंटा वाजवून अगरबत्तीने ओवाळावे.

त्याचप्रमाणे तुपाचे निरांजन लावून, घंटा वाजवून, तुपाचे निरांजनाने ओवाळावे. गणपतीसाठी तयार केलेला नैवेद्य दाखवावा. त्यानंतर विडा, सुपारी सुटे, पैसे यावर पाणी वहावे.

गणपतीची मनोभावे आरती करावी. आरती झाल्यानंतर मंत्रपुष्पांजली म्हणावे.

मंत्रपुष्पांजली नंतर पूजेच्या अक्षता आणि फुले गणपतीला वहावीत.

विसर्जनापर्यंतच्या पूजेमध्ये अनावधानाने झालेल्या चुकांबाबत गणपतीकडे क्षमा याचना करावी.

उपस्थित असलेल्या कुटुंबातील सर्वांनी गणपतीला फुले, अक्षता वाहून नमस्कार करून घ्यावा.

त्यानंतर गणपतीवर उत्तर पूजेच्या अक्षता वाहून गणपती जागेवरून थोडासा हलवायचा आहे.

                       (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी झटका.कॉम)
                      --------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-19.09.2023-मंगळवार.
=========================================