श्रीगणेश चतुर्थी-निबंध-7

Started by Atul Kaviraje, September 19, 2023, 11:12:04 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                    "श्रीगणेश चतुर्थी"
                                   ----------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१९.०९.२०२३-मंगळवार आहे. आज "श्रीगणेश चतुर्थी" आहे. गणेश चतुर्थी हा सण देशातील विविध राज्यांमध्ये साजरा केला जातो. तथापि, हा सण सगळ्या जास्त महाराष्ट्रात साजरा केला जातो. गणेश चतुर्थी हा हिंदूंचा एक अतिशय महत्त्वाचा सण आहे, जो दरवर्षी भाविक मोठ्या जोशाने आणि उत्साहाने साजरा करतात. हिंदू मान्यतेनुसार, गणेश चतुर्थी दरवर्षी भगवान गणेशाच्या वाढदिवस म्हणून साजरा केला जातो. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी, कवी-कवियत्रींना गणेश चतुर्थीच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया गणेश चतुर्थीवर निबंध.

             गणेश उत्सव निबंध मराठी 2023--

     नमस्कार मित्रांनो ह्या पोस्ट मध्ये आपण गणेश उत्सव निबंध मराठी म्हणजेच ganesh utsav essay in marathi बद्दल चर्चा करणार आहोत . ganesh utsav marathi nibandh म्हणजेच ganesh chaturthi essay in marathi हा निबंध आपण १०० , ३०० आणि ५०० शब्दात जाणून घेणार आहोत . तर चला सुरु करूया ...

     गणेशोत्सव हा हिंदू धर्मीयांचा एक महत्त्वपूर्ण उत्सव आहे . हा उत्सव पूर्ण भारतात भक्तिभावाने साजरा केला जातो . गणरायाचे आगमन भाद्रपद शुध्द चतुर्थीस होते . सर्व घरांमध्ये व सार्वजनिक मंडळांमध्ये श्री गणेश मूर्तीची स्थापना केली जाते . गणपतीला दुर्वा व लाल फुले अर्पण केली जातात . मोदक , पुरणपोळी , लाडू तयार करून गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवले जातात . पण नंतर प्रसाद वाटला जातो .

     गणरायाचे भक्त मोठ्या उत्साहाने गणेश मूर्तीची पूजा व आरती करतात . पूर्वी हा उत्सव घरगुती स्वरूपात साजरा केला जायचा . परंतु 1893 साली लोकांमध्ये एकी यावी म्हणून लोकमान्य टिळकांनी हा सण सार्वजनिक स्वरूपात साजरा करण्याची पद्धत चालू केली . दहा दिवस हा सण आनंदाने साजरा केला जातो .

              गणेश उत्सव निबंध--

     आपल्या भारत देशात अनेक सण मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात . जसे गुढीपाडवा, दिवाळी, दसरा ,नागपंचमी, मकरसंक्रात ,गणेश उत्सव, होळी इत्यादी . या सर्व सणांमध्ये मला गणेशोत्सव हा सण खूप खूप आवडतो . गणेशाला अनेक नावे आहेत . कोणत्याही शुभकार्याची सुरुवात गणेश पूजनाने होते .. अशा या गणेशाच्या सण अर्थात गणेश उत्सव होय . गणेश उत्सव हा अत्यंत लोकप्रिय सण आहे . हा सण भाद्रपद महिन्यात येतो. भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थीस लोक मोठ्या भक्तिभावाने गणेशाची मूर्ती घरी आणतात .

     आकर्षक सजावट आरास केलेल्या ठिकाणी गणेश मुर्ती स्थान दिले जाते . लोक दररोज सकाळ-संध्याकाळ गणेशाची आनंदाने आरती करतात . हा सण लहानपणापासून थोरांपर्यंत या सर्वांना खूप आवडतो . गणेशाला गोड गोड नैवद्य दाखवला जातो. उदाहरणार्थ मोदक, खीर ,पुरणपोळी ,लाडू इत्यादी . असा हा सण किमान दीड ते कमाल 11 दिवसांपर्यंत साजरा केला जातो . गणेशोत्सव घरी तसेच सार्वजनिक ठिकाणी आनंदाने साजरा केला जातो. व अनंत चतुर्थीच्या दिवशी गणेश मूर्तीचे विसर्जन तलाव, नदी किंवा समुद्रात केले जाते .

     गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणत सारे जण आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देतात . सार्वजनिक गणेशोत्सव ची प्रथम सुरूवात लोकमान्य टिळकांनी केली . या निमित्ताने सर्व लोक एकत्र येतील व विचारांची देवाणघेवाण होईल. हा उद्देश टिळकांचा होता. स्वातंत्र्यपूर्व काळात सुरू केलेल्या या उत्सवाचे स्वरूप आता विस्तारले आहे. अनेक सार्वजनिक मंडळे या काळात सामाजिक, ऐतिहासिक ,तसेच पौराणिक सुंदर देखावे या काळात करतात . भारतात वेगवेगळे स्पर्धांचे आयोजन सार्वजनिक मंडळे करतात .

     यामुळे सर्वत्र आनंदी उत्साही वातावरण दिसून येते. पूर्वी शाडूच्या मातीपासून गणपतीच्या मूर्ती बनवल्या जात असत . पण आजच्या काळात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती बनवल्या जातात पण या मूर्ती पाण्यात विरघळत नसल्यामुळे पाणी प्रदूषित होते. त्यामुळे आपण पर्यावरणपूरक गणेशउत्सव साजरा करण्यावर भर दिला पाहिजे . आपण सगळयांनी प्रदूषण मुक्त व पर्यावरण पूरक उत्सव साजरे केले पाहिजेत . गणपती विसर्जनात म्हणेजच मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांचा उपयोग करायाला हवा. समाजाला चांगला मार्ग दाखवण्याचे काम गणेश मित्र मंडळांनी करायाला हवे .

     यासाठी प्रत्येक माणसाने ठरवावे कि आपण उत्सव साजरे करत आहोत त्याने पर्यावरणाला काही हि हानी होता काम नये . व त्यासाठी प्रत्येकाने झटायला हवे. व ह्याने गणेश उत्सवाचे महत्व नक्कीच वाढेल . असा हा गणेशोत्सव मला खूप खूप आवडतो .

--by Pritam Sansare
------------------------

                       (साभार आणि सौजन्य-संदर्भ-ज्ञान जेनिक्स.कॉम)
                      ------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-19.09.2023-मंगळवार.
=========================================