श्रीगणेश चतुर्थी-कविता-15-आशिर्वाद द्यावा, तू आज गजानना

Started by Atul Kaviraje, September 19, 2023, 11:50:29 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje


                                     "श्रीगणेश चतुर्थी"
                                    ----------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१९.०९.२०२३-मंगळवार आहे. आज "श्रीगणेश चतुर्थी" आहे. गणेश चतुर्थी हा सण देशातील विविध राज्यांमध्ये साजरा केला जातो. तथापि, हा सण सगळ्या जास्त महाराष्ट्रात साजरा केला जातो. गणेश चतुर्थी हा हिंदूंचा एक अतिशय महत्त्वाचा सण आहे, जो दरवर्षी भाविक मोठ्या जोशाने आणि उत्साहाने साजरा करतात. हिंदू मान्यतेनुसार, गणेश चतुर्थी दरवर्षी भगवान गणेशाच्या वाढदिवस म्हणून साजरा केला जातो. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी, कवी-कवियत्रींना गणेश चतुर्थीच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया गणेश चतुर्थी कविता.

           आशिर्वाद द्यावा, तू आज गजानना--

आशिर्वाद द्यावा , तू आज गजानना!!
परतीच्या वाटेवरी, क्षण हा रेंगाळला!!

तुझे चित्र राहो , मनी या माझ्या सदा!!
विरह हा तो आज , वाटे न यावा पुन्हा !!

विघ्नहर्ता तू , तूच आहेस लंबोदरा!!
तुझे जाणे असे की , पाह तू वळूनी जरा!!

चूकभूल न उरावी , हेच मागणे नंदना!!
गोडी त्या मोदकाची , रेंगाळुदे आता सदा !!

राग ,द्वेष, मत्सर, घेऊन जा तू तुझ्यासवे जरा !!
सुख, समृद्धी आणि आरोग्य , नांदू दे इथे सदा !!

ऐक तू माझे, लंबकर्णा , पितांबरा!!
एकदंत तू , धूम्रवर्ण तू , तुझ्याविना न कोण विश्र्वमुखा !!

परतुनी पुन्हा येण्या , वचन दे तू मला!!
डोळ्यात आहे पाणी , आठवणीत आहेस तू सदा !!

आशिर्वाद द्यावा, तू आज गजानना !!

--योगेश खजानदार
-----------------

                        (साभार आणि सौजन्य-संदर्भ-स्टडी लेक्सा.कॉम)
                       ------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-19.09.2023-मंगळवार.
=========================================