श्रीगणेश चतुर्थी-गीत-3-अशी चिक मोत्याची माळ

Started by Atul Kaviraje, September 19, 2023, 12:08:19 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                    "श्रीगणेश चतुर्थी"
                                   ----------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१९.०९.२०२३-मंगळवार आहे. आज "श्रीगणेश चतुर्थी" आहे. गणेश चतुर्थी हा सण देशातील विविध राज्यांमध्ये साजरा केला जातो. तथापि, हा सण सगळ्या जास्त महाराष्ट्रात साजरा केला जातो. गणेश चतुर्थी हा हिंदूंचा एक अतिशय महत्त्वाचा सण आहे, जो दरवर्षी भाविक मोठ्या जोशाने आणि उत्साहाने साजरा करतात. हिंदू मान्यतेनुसार, गणेश चतुर्थी दरवर्षी भगवान गणेशाच्या वाढदिवस म्हणून साजरा केला जातो. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी, कवी-कवियत्रींना गणेश चतुर्थीच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया गणेश चतुर्थी गीत.

               अशी चिक मोत्याची माळ--

अशी चिक मोत्याची माळ
होती ग तीस तोळ्याची ग
चिक मोत्याची माळ
होती ग तीस तोळ्याची ग

जसा गणपती चा गोंडा
चौरंगी लाल बावटा ग
या चिक माळेला

रेशमी बावशार दोरा ग
माऊ रेशमाच्या दोऱ्यात
नौरंगी माळ ओविली ग

अशी चिक मोत्याची माळ
होती ग तीस तोळ्याची ग
चिक मोत्याची माळ
होती ग तीस तोळ्याची ग

जसा गणपती चा गोंडा
चौरंगी लाल बावटा ग

अशा चिक माळेला
हिऱ्याचे आठ आठ पदर ग
अशी तीस तोळ्याची माळ
गणपतीला ग घातली ग

अशी चिक मोत्याची माळ
होती ग तीस तोळ्याची ग
चिक मोत्याची माळ
होती ग तीस तोळ्याची ग

जसा गणपती चा गोंडा
चौरंगी लाल बावटा ग
गोऱ्या गणपतीला फुलून
माळ शोभली ग

अशी चिक मोत्याची माळ
होती ग तीस तोळ्याची ग
चिक मोत्याची माळ
होती ग तीस तोळ्याची ग

चिक मोत्याची माळ
होती ग तीस तोळ्याची ग
जसा गणपती चा गोंडा
चौरंगी लाल बावटा ग

त्याने गोड हासुनी
मोठा आशीर्वाद दिला ग
चला चला करूया नमन

गणराया ला ग
त्याचा आशीर्वाद ने
करू सुरुवात शुभ करायला ग

अशी चिक मोत्याची माळ
होती ग तीस तोळ्याची ग
चिक मोत्याची माळ
होती ग तीस तोळ्याची ग

जसा गणपती चा गोंडा
चौरंगी लाल बावटा ग

                         (साभार आणि सौजन्य-संदर्भ-स्टडी लेक्सा.कॉम)
                        ------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-19.09.2023-मंगळवार.
=========================================