श्रीगणेश चतुर्थी-गणपती बाप्पाच्या शुभेच्छा-3

Started by Atul Kaviraje, September 19, 2023, 03:03:30 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje


                                    "श्रीगणेश चतुर्थी"
                                   ----------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१९.०९.२०२३-मंगळवार आहे. आज "श्रीगणेश चतुर्थी" आहे. गणेश चतुर्थी हा सण देशातील विविध राज्यांमध्ये साजरा केला जातो. तथापि, हा सण सगळ्या जास्त महाराष्ट्रात साजरा केला जातो. गणेश चतुर्थी हा हिंदूंचा एक अतिशय महत्त्वाचा सण आहे, जो दरवर्षी भाविक मोठ्या जोशाने आणि उत्साहाने साजरा करतात. हिंदू मान्यतेनुसार, गणेश चतुर्थी दरवर्षी भगवान गणेशाच्या वाढदिवस म्हणून साजरा केला जातो. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी, कवी-कवियत्रींना गणेश चतुर्थीच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा.

         गणपती बाप्पाच्या शुभेच्छा--

=========================================
श्रींच्या चरणी कर माझे जुळले,
तुझ्या दर्शनाने सर्व काही मिळाले,
तुझ्या येण्याने हर्ष, उल्हास,
सुख, समृध्दी, ऐश्वर्य लाभले,
अशीच कृपा सतत राहू दे...
सर्व मित्रांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा...!!!

सर्व मित्रांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा
देवबाप्पा तू सोबत असतो
म्हणून
संकटाना समोर जाण्याची
ताकद दुप्पट होते.
|| गणपती बाप्पा मोरया ||

जो पर्यंत जिवंत आहे तोपर्यंत
तुज नाव ओठावर असेल आणि
ज्या दिवशी तुज नाव माझ्या ओठावर
नसेल त्यादिवशी बाप्पा मी तुझ्या जवळ असेल...

तुमच्या आयुष्यातला आनंद,
गणेशाच्या पोटा इतका विशाल असो,
अडचणी उंदरा इतक्या लहान असो,
आयुष्य सोंडे इतके लांब असो,
क्षण मोदका इतके गोड असो,
गणेश चतुर्थीच्या
हार्दिक शुभेच्छा.

बाप्पा आला माझ्या दारी
शोभा आली माझ्या घरी
संकट घे देवा तू सामावून
आशीर्वाद दे भरभरुन...
गणपती
बाप्पामोरया..
मंगलमूर्ती मोरया..

कैलासाहून बाप्पा तुझी सुटली
कारे स्वारी वाटेत कुठे राहू
नकोस सरळ ये घरी...

पग में फूल खिले। हर खुशी आपको मिले।
कभी न हो दुखों का सामना।
यही मेरी गणेश चतुर्थी की शुभकामना.
=========================================

              (साभार आणि सौजन्य-संदर्भ-स्टेटस फॉर सोशल मीडिया.कॉम)
             -------------------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-19.09.2023-मंगळवार.
=========================================