श्रीगणेश चतुर्थी-गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा-1

Started by Atul Kaviraje, September 19, 2023, 03:06:45 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                     "श्रीगणेश चतुर्थी"
                                    ----------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१९.०९.२०२३-मंगळवार आहे. आज "श्रीगणेश चतुर्थी" आहे. गणेश चतुर्थी हा सण देशातील विविध राज्यांमध्ये साजरा केला जातो. तथापि, हा सण सगळ्या जास्त महाराष्ट्रात साजरा केला जातो. गणेश चतुर्थी हा हिंदूंचा एक अतिशय महत्त्वाचा सण आहे, जो दरवर्षी भाविक मोठ्या जोशाने आणि उत्साहाने साजरा करतात. हिंदू मान्यतेनुसार, गणेश चतुर्थी दरवर्षी भगवान गणेशाच्या वाढदिवस म्हणून साजरा केला जातो. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी, कवी-कवियत्रींना गणेश चतुर्थीच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा.

     या वर्षी गणेश चतुर्थी 19 सप्टेंबर 2023 या दिवशी आहे आणि आपण सर्व आपआपल्या घरात बाप्पाच्या स्वागताची जोरात तयारी करत आहोत. या खास प्रसंगी आपण घरात गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करून अनंत चतुर्दशीपर्यंत पूजा-अर्चना करतो.

        गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा--

=========================================
हे गणराया संपूर्ण भारत देशात आलेल्या
कोरोना सारख्या भयानक रोगापासून
संपूर्ण देशाला मुक्त कर हिच तुझ्या चरणी प्रार्थना..
गणेश चतुर्थी निमित्त सर्वाना
हार्दिक शुभेच्छा 🙏🌺

मोदकांचा प्रसाद केला
लाल फुलांचा हार सजवला
मखर नटून तयार झाले
वाजत गाजत बाप्पा आले
गुलाल फुले अक्षता उधळे
बाप्पाच्या स्वागतासाठी जमले सगळे...
🙏🌺 सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🌺

तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत ,
सर्वांना सुख, समृध्दी, ऎश्वर्य,शांती,आरोग्य लाभो हीच
बाप्पाच्या चरणी प्रार्थना. "
गणपती बाप्पा मोरया , मंगलमुर्ती मोरया !!!

बाप्पाच्या येण्याने चैतन्य बहरले
दुःख आणि संकट दूर पळाले
तुझ्या भेटीची आस लागते
तुझ्या नामस्मरणात वर्ष सरून जाते
अखेर गणेश चतुर्थीला भेट घडते...
🙏🌺श्री गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा🙏🌺

गणराया तुझ्या येण्याने
सुख, समृध्दी, शांती, आरोग्य लाभले
सर्व संकटाचे निवारण झाले
तुझ्या आशिर्वादाने यश लाभले
असाच आशीर्वाद राहू दे...
🌺गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा !🌺

फुलांची सुरुवात कळीपासून होते,
जीवनाची सुरुवात प्रेमापासून होते
प्रेमाची सुरुवात आपल्यापासून होते,
आणि आपली कामाची सुरुवात
श्री गणेशा पासून होते
|| गणपती बाप्पा मोरया ||
|| मंगल मूर्ती मोरया ||
=========================================

--by Marathi Varsa Team
----------------------------

                       (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी वारसI.कॉम)
                      -------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-19.09.2023-मंगळवार.
=========================================