श्रीगणेश चतुर्थी-गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा-2

Started by Atul Kaviraje, September 19, 2023, 03:08:13 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                    "श्रीगणेश चतुर्थी"
                                   ----------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१९.०९.२०२३-मंगळवार आहे. आज "श्रीगणेश चतुर्थी" आहे. गणेश चतुर्थी हा सण देशातील विविध राज्यांमध्ये साजरा केला जातो. तथापि, हा सण सगळ्या जास्त महाराष्ट्रात साजरा केला जातो. गणेश चतुर्थी हा हिंदूंचा एक अतिशय महत्त्वाचा सण आहे, जो दरवर्षी भाविक मोठ्या जोशाने आणि उत्साहाने साजरा करतात. हिंदू मान्यतेनुसार, गणेश चतुर्थी दरवर्षी भगवान गणेशाच्या वाढदिवस म्हणून साजरा केला जातो. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी, कवी-कवियत्रींना गणेश चतुर्थीच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा.

     गणेश चतुर्थी चा हा सण संपूर्ण भारतभर मोठ्या श्रद्धेने साजरा केला जातो. आजच्या या लेखामध्ये आम्ही तुमच्या साठी Ganesh chaturthi message in Marathi, Ganesh Chaturthi status in marathi 2023, Ganesh chaturthi quotes in Marathi, Ganesh chaturthi images in Marathi घेऊन आलो आहोत.

     या गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा तुम्ही तुमच्या मित्रांसोबत वर नातेवाईकांसोबत Facebook आणि Whatsapp वर शेअर करू शकता. मला आशा आहे तुम्हाला हे ganpati bappa status marathi मध्ये आवडतील.

        गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा--

=========================================
तूच सुखकर्ता तूच दुःखहर्ता
अवघ्या दिनांचा नाथा
बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे
चरणी ठेवितो माथा.

बाप्पा आला माझ्या दारी
शोभा आली माझ्या घरी
संकट घे देवा तू सामावून
आशीर्वाद दे भरभरुन...
गणपती बाप्पा मोरया, 🙏
मंगल मूर्ती मोरया... 🌺

नूर गणेशाच्या प्रकाशाला भेटला
प्रत्येकाच्या मनाला धडकी भरते
गणेशाच्या दारावर जे काही जात
त्यांना नक्कीच काहीतरी मिळेल
🙏 || गणपती बाप्पा मोरया || 🙏

माझे गणराज ............
येतील गणराज मुषकी बैसोनी
स्वागत करुया तयांचे हसोनी
आनंदे भरेल घर आणि सदन
घरात येता प्रसन्न गजवदन
देतील आशिर्वादा सेवून ते मोदका
कळवा तुमच्या इच्छा त्यांच्या लाडक्या मूषका
जाणून तुमच्या इच्छा साऱ्या प्रसन्न मंगलमूर्ती
करतील योग्य वेळी तुमच्या इच्छांची पूर्ती
भरून साऱ्यांच्या हृदयी उरती गणांचे अधिपती
सर्वांना सद्बुद्धी देवोत आपले बाप्पा गणपती 🙏

गणेशचतुर्थीचा दिवस आहे खास
घरात आहे लंबोदराचा निवास
दहा दिवस आहे आनंदाची रास
अनंत चतुर्थीला मात्र मन होते उदास...
सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा! 🙏

आजपासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवाच्या तुम्हाला,
व तुमच्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा!
बुद्धीची देवता असलेला गणपतीराया,
आपणा सर्वांना सुख, समृद्धी व यशप्राप्तीसाठी,
आशीर्वाद देवो, अशी त्याच्या चरणी प्रार्थना...
गणपती बाप्पा मोरया!! 🙏
=========================================

--by Marathi Varsa Team
----------------------------

                      (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी वारसI.कॉम)
                     -------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-19.09.2023-मंगळवार.
=========================================