श्रीगणेश चतुर्थी-गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा-4

Started by Atul Kaviraje, September 19, 2023, 03:11:03 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                    "श्रीगणेश चतुर्थी"
                                   ----------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१९.०९.२०२३-मंगळवार आहे. आज "श्रीगणेश चतुर्थी" आहे. गणेश चतुर्थी हा सण देशातील विविध राज्यांमध्ये साजरा केला जातो. तथापि, हा सण सगळ्या जास्त महाराष्ट्रात साजरा केला जातो. गणेश चतुर्थी हा हिंदूंचा एक अतिशय महत्त्वाचा सण आहे, जो दरवर्षी भाविक मोठ्या जोशाने आणि उत्साहाने साजरा करतात. हिंदू मान्यतेनुसार, गणेश चतुर्थी दरवर्षी भगवान गणेशाच्या वाढदिवस म्हणून साजरा केला जातो. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी, कवी-कवियत्रींना गणेश चतुर्थीच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा.

      गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा--

=========================================
आजच्या ह्या मंगलदिनी सर्व गणेशभक्तांच्या मनातील
सर्व ईच्छित मनोकामना श्री गणराय पूर्ण करोत,
हिच गणरायाच्या चरणी प्रार्थना...
वक्रतुंड महाकाय, सूर्यकोटि समप्रभ ।।
निर्विघ्नं कुरुमेदेव, सर्वकार्येषु सर्वदा ।।
।। ॐ गं गणपतये नमः ।।

🌺तुमच्या आयुष्यातला आनंद,
गणेशाच्या पोटा इतका विशाल असो,
अडचणी उंदरा इतक्या लहान असो,
आयुष्य सोंडे इतके लांब असो,
क्षण मोदका इतके गोड असो,
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा...🙏🌺

गणेश चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा
गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया🌺

चारा घालतो गाईला
प्रथा ना करतो गणेशाला
सुखी ठेव माझ्या मित्राला
हेच वंदन गणपतीला

ऊँ गं गणपतये नमो नमः
शुभ सकाळ
सर्व गणेश भक्तांना
गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा...
गणपती बाप्पा मोरया !

सर्व गणेशभक्तांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!
आपल्याला सर्वांना हे वर्ष आनंदाचे जावो,
हीच गणरायाकडे अमुची मनोकामना!
गणपती बाप्पा मोरया! मंगलमुर्ती मोरया

गणेश चतुर्थीच्या सुखकारक शुभेच्छा!
गणपती बाप्पा मोरया मंगलमुर्ति मोरया

"सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दीक शुभेच्छा.
तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत ,
सर्वांना सुख, समृध्दी, ऎश्वर्य,शांती,आरोग्य लाभो हीच
बाप्पाच्या चरणी प्रार्थना. "
गणपती बाप्पा मोरया , मंगलमुर्ती मोरया !!!
=========================================

--by Marathi Varsa Team
----------------------------

                        (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी वारसI.कॉम)
                       -------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-19.09.2023-मंगळवार.
=========================================