श्रीगणेश चतुर्थी-गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा-6

Started by Atul Kaviraje, September 19, 2023, 03:13:59 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje


                                     "श्रीगणेश चतुर्थी"
                                    ----------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१९.०९.२०२३-मंगळवार आहे. आज "श्रीगणेश चतुर्थी" आहे. गणेश चतुर्थी हा सण देशातील विविध राज्यांमध्ये साजरा केला जातो. तथापि, हा सण सगळ्या जास्त महाराष्ट्रात साजरा केला जातो. गणेश चतुर्थी हा हिंदूंचा एक अतिशय महत्त्वाचा सण आहे, जो दरवर्षी भाविक मोठ्या जोशाने आणि उत्साहाने साजरा करतात. हिंदू मान्यतेनुसार, गणेश चतुर्थी दरवर्षी भगवान गणेशाच्या वाढदिवस म्हणून साजरा केला जातो. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी, कवी-कवियत्रींना गणेश चतुर्थीच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा.

      गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा--

=========================================
🙏हाती कडे पायी तोडे पैंजणाची,
रुणझुण नथकूडी बाई बुगडी कंकणाची,
झुमझुम मधुर ध्वनीच्या नादामध्ये
भक्तां घरी चालली,
सोनियाच्या पावलांनी महालक्ष्मी आली...
आपणा सर्व प्रिय जणांना..
माता जेष्ठ गौरी आव्हानाच्या,
हार्दिक शुभेच्छा...🌺

आज गौरी आगमन
गौरीच्या प्रवेशाने
तुमच्या घरात,
सुखं शांती आणि धनधान्याची..
भरभराट होऊ दे...🌺

निरोप घेतो देवा आम्हा आज्ञा असावी
चुकले आमुचे काही त्याची क्षमा असावी
आभाळ भरले होते तु येताना,
आता डोळे भरुन आलेत तुला पाहुन जाताना..

रुप तुझे देखणे किती अविस्मरणीय वाटते
पुन्हा पुन्हा पाहता किती ओढ वाटते
कोणत्या रूपामध्ये भेटशील ना कळे
धन्य जन्म वाटतो "मोरया" तुझ्यामुळे..!🙏

दाटला जरी कंठ तरी
निरोप देतो तुला हर्षाने
माहीत आहे मला देवा..
पुन्हा येणार तु वर्षाने..!
🙏!!गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या!!🙏

देव येतोय माझा...
आस लागली तुझ्या दर्शनाची,
तुला डोळे भरून पाहण्याची,
कधी उजाडेल ती सोनेरी पहाट,
🙏गणराया तुझ्या आगमनाची...🙏

श्रावण सरला, भाद्रपद चतुर्थीची पहाट आली,
सज्ज व्हा फुले उधळायला
गणाधिशाची स्वारी आली
🙏गणपती बाप्पा मोरया!🙏
=========================================

--by Marathi Varsa Team
----------------------------

                        (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी वारसI.कॉम)
                       --------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-19.09.2023-मंगळवार.
=========================================