श्रीगणेश चतुर्थी-गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा-9

Started by Atul Kaviraje, September 19, 2023, 03:17:58 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                    "श्रीगणेश चतुर्थी"
                                   ----------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१९.०९.२०२३-मंगळवार आहे. आज "श्रीगणेश चतुर्थी" आहे. गणेश चतुर्थी हा सण देशातील विविध राज्यांमध्ये साजरा केला जातो. तथापि, हा सण सगळ्या जास्त महाराष्ट्रात साजरा केला जातो. गणेश चतुर्थी हा हिंदूंचा एक अतिशय महत्त्वाचा सण आहे, जो दरवर्षी भाविक मोठ्या जोशाने आणि उत्साहाने साजरा करतात. हिंदू मान्यतेनुसार, गणेश चतुर्थी दरवर्षी भगवान गणेशाच्या वाढदिवस म्हणून साजरा केला जातो. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी, कवी-कवियत्रींना गणेश चतुर्थीच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा.

        गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा--

=========================================
स्वर्गात पण जे सुख मिळणार नाही
ते तुझ्या चरणाशी आहे.
कितीही मोठी समस्या असुदे बाप्पा
तुझ्या नावातच समाधान आहे.
🌺गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!🌺

गर्दी नाही, पण उत्साह तोच..
मिरवणुका नाहीत, तरी जयघोष तोच..
ढोल ताशांचा गजर नाही,पण टाळ्यांचा
कडकडाट तोच..मूर्तीचा आकार मोठा नाही,
पण मनातला भाव तोच..मंडपांमधे नाही,
पण घराघरांतआणि मनामनात
🌺बाप्पा मात्र तोच...!
सर्वांना गणेशचतुर्थीच्या हार्दीक शुभेच्छा.🌺

!! सकाळ हसरी असावी!!
!! बाप्पाची मूर्ती नजरेसमोर दिसावी !!
!! मुखी असावे बाप्पाचे नाम !!
!! सोपे होई सर्व काम!!
🌺गणेश चतुर्थीच्या हार्दीक शुभेच्छा.🌺

बाप्पा एक तूच आहेस जो
सोबत राहायचं प्रॉमिस देत नाही
पण साथ माझी कधी सोडत नाही.🌺🙏

१० दिवस मंडपात आणि
३५५ दिवस आमच्या हृदयात
राहणारा बाप्पा येतोय.
🌺गणपती बाप्पा मोरया!🌺

🙏कितिही काढल्या प्रतिमा
तुझ्या तरी भरत नाही रे मन
आम्ही समाधानी त्या दिवशी होऊ
जेव्हा होईल तुझे आगमन.🙏

🙏श्वास मोजावे तसे तास मोजतोय
तुझ्या येण्याची बाप्पा आस पाहतोय
आतुरता आगमनाची.🙏
=========================================

--by Marathi Varsa Team
----------------------------

                      (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी वारसI.कॉम)
                     -------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-19.09.2023-मंगळवार.
=========================================