पावसातील प्रेम कविता-गीत-पाऊस पडतोय फक्त आपल्यासाठी,तुझं माझं प्रेम जुळवण्यासाठी

Started by Atul Kaviraje, September 19, 2023, 06:36:18 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज मी तुम्हाला, पावसातील मने जुळवणारी एक प्रेम कविता-गीत ऐकवितो. "जब जब सावन बरसता है, दिल मिलने को तरसता है"- या हिंदी गाण्यावर ते आधारित आहे. आशा आहे ते तुम्हाला आवडेल. भरभरून लाईक करा, व मला प्रोत्साहित करा. आपणा सर्वांस सप्टेंबर महिन्याची ही पाऊस थांबलेली, परंतु आकाश काळ्या ढगांनी झाकलेली, मंद वIरI वहIत असलेली, मंगळवार-संध्याकाळ आनंदाची जावो, ही सदिच्छा.

--मूळ हिंदी गाणे-( जब जब सावन बरसता है, दिल मिलने को तरसता है )
----------------------------------------------------------------

            "पाऊस पडतोय फक्त आपल्यासाठी, तुझं माझं प्रेम जुळवण्यासाठी"
           -----------------------------------------------------------

पाऊस पडतोय फक्त आपल्यासाठी
तुझं माझं प्रेम जुळवण्यासाठी
जेव्हा जेव्हा तो पडत असतो,
काही अर्थ असतो त्याच्या बरसण्यापाठी
     
पाऊस पडतोय फक्त आपल्यासाठी
तुझं माझं प्रेम जुळवण्यासाठी
पडतI पडतI तो सांगत असतो,
स्वर्गात बांधल्या गेल्यात तुमच्या प्रेम-गाठी

जेव्हा जेव्हा तो रिमझिम पडतो, जेव्हा जेव्हा तो झिमझिम बरसतो
तेव्हा तेव्हा मला प्रेमाची नवीन अनुभूती येते, अन पुन्हा मी प्रेमात पडतो
अचानक तुझी मला आठवण येते, तुझ्या आठवांचा गंध वIरI वहIत आणतो,
मनाला आवर नाही घालता येत तेव्हा, मनाचा तेव्हा बांध फुटत असतो

हे मन तुझ्या आठवणीत अगदीच उदास होऊन जातं, खिन्न होऊन जातं
हे मन तुझ्या आठवणीत मग बहकत राहतं, भटकत राहतं, त्याला भान नसतं
तुझ्या मिलनासाठी मग ते तरसत राहतं, तुझ्या ओढीने तळमळत राहतं,
तुला पाहिल्याशिवाय मनाला राहत मिळत नाही, वाटेकडे डोळे लावून असतं

असं काय असतं या पावसात, हा पाऊस का असा गूढ वाटतो ?
पावसाच्या पडण्यात काय असतं रहस्य, इतका का तो मूढ करतो
त्याच्या पडण्यात काय जादू भरलीय, की तो जणू काही मोहिनी घालतो,
त्याच्या पडण्याने मन इतकं कासावीस का होतं, मनाचा जणू तो ताबाच घेतो

नेहमीच पडतIना हा पाऊस मनाची परीक्षा घेत असतो
हा पाऊस बरसतI बरसतI माणसाची पारख करत असतो
तो इतका मनकवडा आहे की, जणू मनातलेच ओळखत असावा,
प्रेमात कोण पागल झालंय, कोण वेड झालंय, याचा हिशोब तो ठेवत असावा

नेहमीसारख्याच त्याच्या शीत जलधारा देहाला तीक्ष्ण घाव देत असतात
नेहमीसारखेच त्याचे गIर थेम्ब मनावर आघात करीत असतात
इतक्या थंड प्रवृत्तीचा पाऊस अचानक इतका तप्त, दग्ध का वाटू लागतो ?,
निसर्गाचा हा, अमृत जल वाटणारा देवदूत तना मनास जIळत का जातो ?

ही आग, ही जलन, सर्वांग सुन्न करून टाकते, बेचिराख करून टाकते
हे तप्त तन, हे दग्ध मन, यांचं कसं होणार शमन, कोण विझविणार ही आग ?
मग मन प्रेमाचा सहारा शोधतं, कुणाचातरी आधार शोधतं, जे मनIस थारवतं,
मग मन एक कुणी साथीदार शोधतं, कुणीतरी आपलं शोधतं, ज्याने मन स्थिरावेल

मग ते कुणाचीही नाही पर्वा करत, कुणाचीही तमI नाही बाळगत
मग ते जमानाच्या विरुद्ध जात, प्रेमासाठी ते कोणत्याही थराला जातं
सारं सारं विसरून ते प्रेमात गुंतून राहत, एकमेकांत हरवून बसतं,
माझीही मन:स्थिती अगदी अशीच असते , प्रिये, जेव्हा ते तुला पाहतं

या पावसाने वेड तर लावलच आहे,  तूही मला आणखी पागल करू नकोस
तुला भेटण्यासाठी कधीचI मी तरसतोय, अशी माझ्यापुढे तू नको धावूस 
पावसात भिजणारI तुझा महकणारा ओला पदर, मला तुझ्याकडे खेचतोय,
वातावरणात भिनणारा तुझा ओला सुगंध, मला तुझ्याकडे आकर्षित करतोय 

हा मोसम बघ मदहोशच करतोय, मला तो बेहोषच करतोय
हा पडणाऱ्या पावसाचा दोषच नाहीय, माझ्याच मनाचा सारा खेळ असतोय
तो फक्त आहे निमित्तमात्र, तो फक्त संकेत देत असतो, सूचित करत असतो,
त्याच्या उधाणत्या बेधुंद लहरींनी, मनात प्रेमाच्या उंच लाटा उसळवतो

या पावसातच जमले होते आपले प्रेम, जुळली होती आपली प्रीत
कितीही मनस्वी असला तरी त्याने फक्त पहिले होते आपले हीत   
त्याच्या संततधारेत एक संगीत भरलंय, कधी ऐकलंयस तू पावसाचे गीत,
प्रेमात बळेबळेच तो ओढत असतो प्रेमीजनांना, आहे की नाही त्याची अजब रीत

आता दूर राहू नकोस प्रिये, आता अंतर ठेवू नकोस, सखे
शोला भडकत ठेवू नकोस लाडके, मनाला तडपत ठेवू नकोस, सखये
हा दुरावा तना मनाला आणखीनच जIळत जाईल, भस्म करीत राहील,
आता तना मनाचे मिलन होऊ दे, दोन प्रेमी जीवांना प्रेमाचा सहारा मिळू दे

पाऊस पडतोय फक्त आपल्यासाठी
तुझं माझं प्रेम जुळवण्यासाठी
पावसाचे पडणे नेहमीच आनंददायी असते,
त्याच खुशीत पावसाचे गीत येते ओठी

पाऊस पडतोय फक्त आपल्यासाठी
तुझं माझं प्रेम जुळवण्यासाठी
हा पाऊस नित्य येतो, भिजवून जातो,
दरवर्षी घेतो तो साऱ्यांच्याच भेटी-गाठी

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-19.09.2023-मंगळवार.
=========================================