पाऊस अद्भुत प्रेम कविता-ढगातून पाण्याचा वर्षाव होतोय,तुला भिजवतोय, मलाही भिजवतोय

Started by Atul Kaviraje, September 20, 2023, 10:56:10 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज मी तुम्हाला, पावसाची एक अद्भुत प्रेम कविता-गीत ऐकवितो. "बादल जो बरसे, तो भीगे तुम हो भिगे हम"- या हिंदी गाण्यावर ते आधारित आहे. आशा आहे ते तुम्हाला आवडेल. भरभरून लाईक करा, व मला प्रोत्साहित करा. आपणा सर्वांस सप्टेंबर महिन्याची ही सतत पाऊस पडणारी, गIर वाऱ्याने मन प्रफुल्लित करणारी, बुधवार-सकाळ आनंदाची जावो, ही सदिच्छा.

--मूळ हिंदी गाणे-( बादल जो बरसे, तो भीगे तुम हो भिगे हम )
------------------------------------------------------

           "ढगातून पाण्याचा वर्षाव होतोय, तुला भिजवतोय, मलाही भिजवतोय"
          -----------------------------------------------------------

ढगातून पाण्याचा वर्षाव होतोय
तुला भिजवतोय, मलाही भिजवतोय
मधूनच वीज लख्खकन जातेय चमकून,
कडकडाट विजेचा, मनात भय जागवतोय

ढगातून पाण्याचा वर्षाव होतोय
तुला भिजवतोय, मलाही भिजवतोय
गडगडणाऱ्या ढगांचा संकेत समजून जा,
निसर्ग नियमाने पावसाळा सुरु होतोय

पावसात भिजण्याची मजा काही आगळीच असते नाही
मुखावर थंडगार तुषार खेळवण्याचा आनंद कुठेच मिळत नाही
भिजायला कधीही वयाचे नसते बंधन, ना त्याला लागते काही धन,
ते हरवलेले बालपण परत गवसत असते, अन तो निखळ आनंदही

बस तुझा साथ हवा या पावसात, भिजण्याची लज्जत अधिकच वाढेल
बस तुझा हात हवा माझ्या हातात, भिजण्याची गम्मत आणिकच दुणावेल
मनसोक्त भिजावे, चिंब भिजावे, अगदी मुक्त मुक्त वहIत जावे,
नखशिखांत भिजावे, जलधारांत नहावे, मनाने मोदीत प्रवाहीत व्हावे

तुही भिज, मीही भिजतो, वेगळ्याच विश्वातला जणू अनुभव येतो
भिजतI भिजतI काहीतरी मिळत जाते, अवर्णनीय आनंदाची अनुभूती देते
हे टपटपणारे जलाचे थेम्ब, जणू दैवी धून छेडतात, सरगम छेडतात,
त्यातून जन्मणारे गीत संगीत, जणू एकI अगम्य मैफिलीत घेऊन जातात

पावसाच्या पडण्याने हा निसर्गही पहा कसा नटलाय
त्याच्या जीवन थेंबांतून जणू अमृत रसच पाझरलाय
वृष्टीने झालीय सृष्टी हिरवीगार, धरित्रीनेही ओढलीय हिरवळीची चादर,
वरूण देवाची होऊन कृपा, त्याच्याबद्दल मनी वाढतोय निरंतर आदर

हा पाऊस भेदभाव नाही करत, सर्वां एकाच नजरेत पाहतो
तो तुला मला भिजवतो, तो साऱ्या भिजवतो, आलम दुनियेला भिजवतो
तो पानाफुलांना भिजवतो, तो कळ्यांना भिजवतो, वृक्ष राईना भिजवतो,
तो डोंगर भिजवतो, कड्याकपारी भिजवतो, तो रस्तेही भिजवतो

पडतI पडतI तो काहीतरी देत असतो, अपेक्षI कधीही करीत नसतो
बरसतI बरसतI तो साऱ्यांना आनंद वाटत असतो, सर्वांची दुःखे घेत असतो
निराशा, उदासी, ताण तणाव साऱ्यांचे पिऊन टाकतो, मनात अभय जागवतो,
उत्साह, उमेद, उधाण, उल्हास घेऊन तनामनात प्रवेशतो, जगण्याची अIसं देतो 

बस या पावसाला समजून घेण्यास एक उदात्त मन हवे, मुक्त विचार हवे
त्याचे पडणे, त्याचे वर्षणे कळण्यास पावसात गुंतून राहावयास हवे
पडताना तो काही सांगत असतो, काही बोलत असतो, कान देऊन ऐकावे,
त्याच्या पडण्यातला अर्थ समजून घेण्यास, त्याला आपलेसे करावे, समजावे

हा पाऊस युगेयुगे पडतोय, हा पाऊस वर्षानुवर्षे बरसतोय
खंड न पIडतI, निसर्ग नियमाचे अचूक तो पालन करतोय
त्याचे गणित कधीच चुकत नाही, वर्षाकाठी त्याचे निश्चित आगमन होते,
आपणच आपले कुठे चुकले पाहावयास हवे, मोठे मन करावयास हवे

ही सारी अनुभूती वर्णनातीत, अवर्णनीय, कल्पनेच्या पार असते
हे ढगातून बरसणारे जीवन जल नेहमीच कुठलातरी साक्षात्कार देत असते
ईश्वर आहे, तो परमेश्वर आहे, पाऊस हा त्याचा नेमस्त देवदूत आहे,
नास्तिकालाही कधीतरी हात जोडावे लागतात, त्याचे प्रमाण हा पाऊसच देत असतो

ढगातून पाण्याचा वर्षाव होतोय
तुला भिजवतोय, मलाही भिजवतोय
मन तृप्त होतेय, समाधानाने भरून येतेय,
मनाला अत्त्युच्च परमानंद प्राप्त होतोय

ढगातून पाण्याचा वर्षाव होतोय
तुला भिजवतोय, मलाही भिजवतोय
हे निसर्ग चक्र अनंत, अखंड सुरु राहते,
पावसाळा मग नेमेचि येत राहतोय 

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-20.09.2023-बुधवार.
=========================================