ऋषीपंचमी-माहिती-4

Started by Atul Kaviraje, September 20, 2023, 05:16:54 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                       "ऋषीपंचमी"
                                      -------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-२०.०९.२०२३-बुधवार आहे. आज "ऋषीपंचमी" आहे. असे म्हटले जाते की, ऋषीपंचमीचे व्रत केल्यामुळे आपल्या हातून घडलेल्या पापांची मुक्तता होते. तसेच दोषांपासून निवारण होते. पितरांच्या नावाने दानधर्म केला तर आपली रखडलेली कामे देखील पूर्ण होतात. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण, कवी-कवियत्रींना ऋषीपंचमीच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया, ऋषीपंचमी वर महत्त्वाची माहिती.

              ऋषिपंचमी व्रताचे फायदे--

     ऋषी पंचमीच्या दिवशी केले जाणारे हे व्रत इतर व्रतांपेक्षा खूप वेगळे आहे. हे व्रत पाळण्याच्या पद्धती, त्याचा उद्देश अतिशय महत्त्वाचा आहे. जाणून घेऊयात या व्रताचे फायदे--

हे व्रत सर्व वयोगटातील महिला महिलांकडून केले जाणारे आहे. त्यांच्या हातून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे घडलेल्या पापातून मुक्ती मिळवण्यासाठी अतिशय महत्त्वाचे असे हे मानले जाते.

हे व्रत करताना कोणत्याही देवतेची पूजा केली जात नाही. या दिवशी फक्त सप्तऋषींची पूजा केली जाते.

अपामार्ग नावाच्या वनस्पतीला या व्रतामध्ये विशेष महत्त्व आहे. या वनस्पतीच्या देठाने स्नान केल्याशिवाय ऋषीपंचमीचे व्रत पूर्ण होत नसते. सर्व पापांचा नाश करणारे हे व्रत अतिशय पुण्याचे आणि फलदायी आहे.

ऋषीपंचमीचे हे व्रत स्त्रिया आणि अविवाहित मुली देखील करतात. लग्न होणे किंवा इच्छित वर मिळवणे यासाठी हे व्रत पाळले जात नाही. याचा एक विशिष्ट प्रकारचा उद्देश असतो.

मासिक पाळीच्या वेळी महिलांच्या हातून ज्या धार्मिक दृष्ट्या चुका होतात आणि त्यापासून आपल्याला दोष मिळतो. त्यापासून संरक्षण करण्यासाठी हे व्रत महत्त्वाचे समजले जाते.

              ऋषिपंचमी का साजरी केली जाते?--

     मासिक पाळीच्या वेळी स्त्रिया नकळतपणे, अनावधानाने चुका करत असतात. तसेच आजच्या या कलियुगामध्ये पापाचे प्रमाण वाढले आहे. प्रत्येकाच्या हातून कळत, नकळत चुका होत असतात. या पापांपासून मुक्ती करायची असेल तसेच दोषांचे निवारण करण्यासाठी आपणही ऋषिपंचमी हे व्रत साजरे करतो. या दिवशी सप्तऋषींची पूजा केली जाते. भारतीय इतिहासातील दिग्गज ऋषींनी शिकवलेले ज्ञान, चिंतन, मनन हे पुढच्या पिढीने चालू ठेवावे. याची आठवण म्हणून आपण हे व्रत साजरे करतो.

              ऋषीपंचमीचे हे व्रत कसे साजरे करतो?--

     या दिवशी घरातील स्त्रिया आणि कुमारिका तसेच पुरुष देखील ऋषिपंचमीचा उपवास करतात. स्वच्छ आंघोळ झाल्यानंतर, स्वच्छ कपडे परिधान करून सप्तऋषींची म्हणजेच महर्षी कश्यप, भारद्वाज, अत्री, विश्वामित्र, गौतम ऋषी, वशिष्ठ, जमदग्नी या सगळ्यांची आपण पूजा करतो. या पूजेनंतर याचे नदीमध्ये विसर्जन करत असतो. या दिवशी स्वकष्टाने लावलेल्या झाडांच्या मुळांची तसेच भाज्यांची आपण ऋषीची भाजी म्हणून नैवेद्य दाखवून नंतर तो आपण प्रसाद म्हणून ग्रहण करतो. या दिवशी कुटुंबातील स्त्रिया, पुरुष तसेच कुमारीका या व्रताचा उपवास करतात. पूजा झाल्यानंतर भगर, वरी तांदळाचा भात त्याचप्रमाणे दही यासारखे पदार्थ खाल्ले जातात.

             ऋषिपंचमीचे नियम --

ऋषीपंचमीच्या दिवशी सप्तऋषींचे पूजन करावयाचे असते.

या दिवशी गायीच्या शेणाने घरातील सर्व जमीन सारवली जाते. तसेच लादी असल्यास ती स्वच्छ पाण्याने पुसून घेतली जाते.

या दिवशी कोणाचीही निंदा करू नये. तसेच कोणाला अपशब्द वापरू नये.

या दिवशी भिक्षुकांना दान करावे.

ऋषीपंचमीच्या दिवशी घरामध्ये कांदा, लसूण यांचा वापर अजिबात करू नये.

या दिवशी घरामध्ये मांसाहार तसेच मद्यपान, धूम्रपान देखील वर्ज्य करावे.

या दिवशी कोणत्याही प्राण्याचा, पक्षाचा बळी देऊ नये.

या दिवशी आपल्या ऐपतीप्रमाणे ब्राह्मणांना दक्षिणा तसेच केळी, साखर यासारख्या वस्तूंचे दान करावे.

स्वकष्टाने लावलेल्या झाडांच्या मुळे तसेच भाज्या यांचा अन्नामध्ये समावेश करावा.

                     (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी झटका.कॉम)
                    --------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-20.09.2023-बुधवार.
=========================================