ऋषीपंचमी-माहिती-10

Started by Atul Kaviraje, September 20, 2023, 05:24:33 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje


                                       "ऋषीपंचमी"
                                      ------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-२०.०९.२०२३-बुधवार आहे. आज "ऋषीपंचमी" आहे. असे म्हटले जाते की, ऋषीपंचमीचे व्रत केल्यामुळे आपल्या हातून घडलेल्या पापांची मुक्तता होते. तसेच दोषांपासून निवारण होते. पितरांच्या नावाने दानधर्म केला तर आपली रखडलेली कामे देखील पूर्ण होतात. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण, कवी-कवियत्रींना ऋषीपंचमीच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया, ऋषीपंचमी वर महत्त्वाची माहिती.

     काल आपल्या सर्वांच्याच घरी गणपती बाप्पाच आगमन झालं आहे. गणपती बाप्पाच्या आगमनाच्या दुसऱ्या दिवशी ऋषी पंचमी असते. महाराष्ट्रातील गावोगावी हरतालिकेप्रमाणेच ऋषी पंचमीचं सुद्धा व्रत मनोभावे केले जातं.

     आपल्या संस्कृती ऋषीपंचमीच्या व्रताचं सुद्धा खूप महत्व असतं. भाद्रपद शुद्ध पंचमीला ऋषिपंचमी म्हणतात. यादिवशी ऋषिंविषयी कृतज्ञता व्यक्त केली जाते. या दिवशी सप्तऋषींची पूजा करून त्यांना वंदन केले जाते.

            आता बघू या ऋषीपंचमीला ऋषी भाजी का केली जाते या विषयीची सविस्तर माहिती...

     ऋषीपंचमीचं व्रत सवाशीण महिला करतात. या व्रताच्या दिवशी महिलांनी धान्य खाऊ नये अशी आख्यायिका आहे. आजही ग्रामीण भागात शेताची नांगरणी करताना बैलाचे पाय ज्या धान्याला लागतात आणि नांगराचा वापर केलेले अन्न पदार्थ ऋषीपंचमीच्या दिवशी खाल्लेच जात नाहीत. अशी प्रथा आहे. म्हणूनच या दिवशी शेताच्या बांध्यावर उगवलेल्या रानभाज्या भाज्या आणि कंदमुळं खाल्ली जातात. आता या सर्व भाज्या शहरांमध्येही बाजारात उपलब्ध असतात. शहरांमध्ये काही भागात ग्रामीण भागातील भाजी विक्रेते या भाज्या विकायला घेऊन येतात.

              ऋषीपंचमीला ऋषी भाजी करता कोणत्या भाज्या मिक्स केल्या जातात?--

     ऋषीपंचमीच्या दिवशी काही ठराविकच भाज्या खाल्ल्या जातात आणि त्यांचीच एकत्रित भाजी या दिवशी बनविली जाते. या दिवशी ठरावीक रानभाज्या, भोपाळ, भेंडी, गवार अशा भाज्यांचा वापर करून खास ऋषीपंचमीची भाजी बनविली जाते. त्यात लाल भोपळा,पडवळ या फळभाज्यांचा तर अळू, लाल माठ, टोकेरी माठ या पालेभाज्यांचा वापर केला जातो. त्याच बरोबर अंबाडी सुद्धा घातली जाते.अळूची पानं, लाल देठं, रताळं, कच्ची केळी, सुरण, लालभोपळा, शिराळी, लाल माठाचे देठ, कणीस, शेंगदाणे, खोबरं घालतात, मिरच्या घातलात. यात मुख्य भाजी ही अळूची असते त्यात या सगळ्या भाज्या एकत्र केल्या जातात. गणेशोत्सवा दरम्यान पावसाळा असतो आणि पावसाळ्यात अनेक पालेभाज्या सहज उपलब्ध असतात त्या भाज्यांचा वापर सुद्धा ऋषीपंचमीच्या भाजी मध्ये केला जातो. कोकणात सुद्धा गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. ऋषी पंचमीच्या या भाजीचे सुद्धा विशेष महत्व आहे.

--By-सकाळ डिजिटल टीम
-------------------------

                        (साभार आणि सौजन्य-संदर्भ-e सकाळ.कॉम)
                       ----------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-20.09.2023-बुधवार.
=========================================