०२-नोव्हेंबर-दिनविशेष

Started by Atul Kaviraje, November 02, 2023, 10:19:27 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-०२.११.२०२३-गुरुवार. जाणून घेऊया, आजच्या दिवसाचे "दिन-विशेष"

                                "०२-नोव्हेंबर-दिनविशेष"
                               ----------------------

-: दिनविशेष :-
०२ नोव्हेंबर
=========================================
अ) महत्त्वाच्या घटना:
   ----------------
१९९९
दाक्षिणात्य पार्श्वगायक एस. पी. बालसुब्रम्हण्यम यांची मध्यप्रदेश सरकारतर्फे दिल्या जाणार्‍या लता मंगेशकर पुरस्कारासाठी निवड. सुगम संगीतातील असाधारण कामगिरीसाठी हा पुरस्कार दिला जातो.
१९४०
दुसरे महायुद्ध – ग्रीस व ईटली यांच्यात युद्ध सुरू झाले.
१९१४
रशियाने ओट्टोमान साम्राज्याविरुद्ध युद्ध पुकारले.
=========================================
ब) जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  -----------------------------
१९६५
शाहरुख खान
शाहरुख खान – अभिनेता व निर्माता
१९६०
अनू मलिक
अन्वर सरदार मलिक तथा अनू आदित्य मलिक उर्फ 'अनू' मलिक – संगीतकार, संगीत दिग्दर्शक, संगीत संयोजक व गायक
१९४१
अरुण शौरी
अरुण शौरी – केंद्रीय माहिती तंत्रज्ञान व दूरसंचार मंत्री, अर्थतज्ज्ञ, पत्रकार, लेखक, राज्यसभा खासदार, योजना आयोगाचे सल्लागार
१९२१
रघूवीर दाते – ध्वनीमुद्रणतज्ञ, हिन्दी, मराठी, गुजराती आणि उडिया भाषांतील सुमारे चाळीस चित्रपटांचे ध्वनीमुद्रण त्यांनी केले.
(मृत्यू: ? ? ????)
१८९७
सोहराब मोदी
सोहराब मेहेरबानजी मोदी – भारतातील चित्रपट निर्मितीचे आद्यप्रवर्तक, दिग्दर्शक व अभिनेते, दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित (१९७९), 'मिनर्व्हा मुव्हीटोन'तर्फे त्यांनी चाळीसहून अधिक चित्रपट निर्माण केले.
(मृत्यू: २८ जानेवारी १९८४)
१८८६
धीरेंद्रनाथ दत्ता
धीरेंद्रनाथ दत्ता – बांगलादेशी राजकारणी
(मृत्यू: २९ मार्च १९७१)
१८८२
डॉ. के. बी. लेले – महाराष्ट्रातील जादूगारांचे आचार्य
(मृत्यू: २ मे १९६३)
१८३३
महेन्द्र लाल सरकार – होमिओपॅथ, समाजसुधारक व विज्ञानप्रसारक, 'इंडियन असोसिएशन ऑफ कल्टिव्हेशन ऑफ सायन्स' या संस्थेचे सहसंस्थापक, होमिओपाथीच्या प्रसारासाठी त्यांनी १८६८ मधे 'जर्नल ऑफ मेडिसीन' हे मासिक सुरू केले.
(मृत्यू: २३ फेब्रुवारी १९०४ - कलकत्ता, पश्चिम बंगाल)
१७५५
मेरी आंत्वानेत
मेरी आंत्वानेत – फ्रेन्च सम्राज्ञी
(मृत्यू: १६ आक्टोबर १७९३)
१४७०
एडवर्ड (पाचवा)
एडवर्ड (पाचवा) – इंग्लंडचा राजा
(मृत्यू: ९ एप्रिल १४८३)
=========================================
क) मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
    -------------------------
२०१२
येरेन नायडू – तेलगु देसम पक्षाचे लोकसभेतील नेते
(जन्म: २३ फेब्रुवारी १९५७)
१९९०
भालचंद्र दिगंबर तथा 'आबासाहेब' गरवारे – प्लॅस्टिक व नायलॉन उद्योगाचे जनक, महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासातील एक प्रमुख शिल्पकार, पद्मभूषण, डि. लिट. (पुणे विद्यापीठ), उद्योजक
(जन्म: २१ डिसेंबर १९०३)
१९८४
शरद्चंद्र मुक्तिबोध – मराठी साहित्यिक
(जन्म: ? ? ????)
१९५०
जॉर्ज बर्नार्ड शॉ – नोबेल पारितोषिक विजेते आयरिश लेखक आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचे (LSE) सहसंस्थापक
(जन्म: २६ जुलै १८५६)
१८८५
बळवंत पांडुरंग तथा 'अण्णासाहेब' किर्लोस्कर – नाटककार
(जन्म: ३१ मार्च १८४३)
=========================================

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-02.11.2023-गुरुवार.
=========================================