दिन-विशेष-लेख-औद्योगिक सुरक्षा दिन

Started by Atul Kaviraje, November 02, 2023, 11:08:38 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje


                                  "दिन-विशेष-लेख"
                               "औद्योगिक सुरक्षा दिन"
                              ----------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-02.11.2023-गुरुवार आहे. ०२-नोव्हेंबर, हा दिवस "औद्योगिक सुरक्षा दिन " म्हणूनही ओळखला जातो. वाचूया, तर या दिवसाचे महत्त्व, आजच्या या "दिन-विशेष-लेख" या शीर्षकI-अंतर्गत.

          Financing due to unsafe machinery and fire--

     दरवर्षी औद्योगिक सुरक्षा सप्ताहात महापालिका अग्निशामक दल व औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागातर्फे उद्योजक व कामगारांमध्ये जागृती केली जाते. यात अग्निशमनाची प्रात्यक्षिके सादर केली जातात. त्याचप्रमाणे औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागातर्फे आपत्कालीन परिस्थिती हाताळण्याकरिता करावयाच्या उपाययोजनांबाबत मॉक ड्रील केले जाते.

       औद्योगिक सुरक्षा दिन विशेष : असुरक्षित यंत्रणा, आगीच्या घटनांमुळे होतेय वित्तहानीही--

     औद्योगिक सुरक्षा व्यवस्थेकडे दुर्लक्ष केल्याने जिल्ह्यात 2018-19 मध्ये दोघांचा व चालू 2019-20 वर्षात तिघांचा अशा एकूण पाच कामगारांचा कारखान्यांमध्ये झालेल्या दुर्घटनेत बळी गेला आहे. सुरक्षा साधनांचा अभाव, सुरक्षा साधने असूनही कामगारांमध्ये साधनांबाबतीत असलेल्या माहितीच्या अभावामुळे तसेच कारखानदार व व्यवस्थापनाच्या दुर्लक्षामुळे असे अपघात होत असल्याची माहिती "सकाळ'शी बोलताना तज्ज्ञांनी दिली.

     शहरातील दोन एमआयडीसीतील उद्योगांमध्ये व जिल्ह्यातील साखर कारखान्यांमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने यंत्रणा सक्षम असून, काही उद्योगांमध्ये सुरक्षा नियमांकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते. चिंचोळी एमआयडीसी येथील अपघातांचे प्रमाण अत्यल्प व किरकोळ असून, अक्कलकोट रोड एमआयडीसी येथील काही उद्योगांमध्ये सुरक्षा साधनांकडे दुर्लक्षामुळे वर्षातून 20 ते 25 आगीच्या दुर्घटना घडून कोट्यवधींची वित्तहानीही होते.

     दरवर्षी औद्योगिक सुरक्षा सप्ताहात महापालिका अग्निशामक दल व औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागातर्फे उद्योजक व कामगारांमध्ये जागृती केली जाते. यात अग्निशमनाची प्रात्यक्षिके सादर केली जातात. त्याचप्रमाणे औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागातर्फे आपत्कालीन परिस्थिती हाताळण्याकरिता करावयाच्या उपाययोजनांबाबत मॉक ड्रील केले जाते. याद्वारे कामगारांमध्ये सुरक्षिततेसंबंधी जागृती निर्माण करण्याचा हेतू असतो. मात्र प्रत्यक्षात कामावर असताना सुरक्षिततेबाबत कामगार जागरूक नसतात. उद्योजकही अग्निशमन यंत्रणांचे नूतनीकरण, त्यांची देखभाल याकडे दुर्लक्ष करतात. कमी पगारात अप्रशिक्षित व कंत्राटी कामगार नेमल्याने अपघाताच्या घटना घडतात. याकडे सोईस्कर दुर्लक्ष केले जाते. एखाद्या मोठ्या दुर्घटनेनंतर मग सुरक्षेसंबंधीचे गांभीर्य लक्षात येते. कालांतराने पुन्हा "जैसे थे'ची स्थिती दिसून येते.

     जिल्ह्यात दोन वर्षात घडलेल्या दुर्घटनेत अक्कलकोट रोड एमआयडीसी, खर्डी (ता. पंढरपूर), मंगळवेढा, टेंभुर्णी एमआयडीसी व मोहोळ तालुक्‍यातील जकराया शुगर येथील प्रत्येकी एका कामगाराचा मृत्यू झाला. चिंचोळी एमआयडीसीतील एका कारखान्याच्या छतावरून पडून एक कामगार जखमी झाला. हे सर्व अपघात सुरक्षा साधनांचा वापर न केल्याने झाल्याची माहिती औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागाचे उपसंचालक प्रमोद सुरसे यांनी "सकाळ'शी बोलताना दिली.

     जिल्ह्यातील औद्योगिक सुरक्षा यंत्रणा चांगली असून, अपघातांचे प्रमाण कमी आहे. आमच्या विभागाकडून प्रत्येक कारखान्याला भेट देऊन तेथील औद्योगिक सुरक्षेसंबंधीची नियमित तपासणी तसेच कामगार व उद्योजकांमध्ये सुरक्षेविषयी जागरूकता निर्माण केली जाते. काही ठिकाणी सुरक्षा साधने असूनही कामगार त्यांचा वापर करत नाहीत. कारखानदार व व्यवस्थापनाने कामगारांच्या सुरक्षेकडे गांभीर्याने लक्ष द्यावे.

     कारखानदारांनी शासनाने लागू केलेल्या फायर ऍक्‍टमधील तरतुदींचे तंतोतंत पालन केल्यास दुर्घटना टाळता येतील. त्यासाठी सक्षम अग्निशमन यंत्रणा (फायर हायडंट, स्प्रिंकलर, स्मोक डिटेक्‍टर व हीट डिटेक्‍टर सिस्टिम) आदी बसवणे आवश्‍यक आहे. अन्यथा मोठ्या आगीसारख्या आपत्तीला सामोरे जावे लागेल.

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-02.11.2023-गुरुवार.
=========================================