प्रेरणादायी कविता-घटस्फोटही वाजत गाजत केला साजरा

Started by Atul Kaviraje, November 02, 2023, 03:22:54 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     यू-ट्यूब वर दिनांक- ०१.११.२०२३-बुधवार रोजी, खालीलप्रमाणे बातमी आली होती.

     Father celebrates daughter's divorce : Jharkhand मधील या बापानं आपल्या मुलीला माहेरी 'असं' परत आणलं--

     झारखंडची राजधानी रांचीमध्ये राहणाऱ्या प्रेम गुप्ता हे काही दिवसांपूर्वी बातम्यांमध्ये चर्चेत आले होते. त्यांचा एक व्हीडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, ज्यात ते त्यांच्या मुलीला वाजत गाजत घरी आणताना दिसत होते. पण त्याचं कारण खूपच वेगळं होतं.

     मित्रांनो, वाचूया, या समाजIतील स्त्री आणि पुरुषांची सम आणि विषम, तसेच स्त्रियांच्या असमान हक्कांवरली, मर्मस्पर्शी पण तितकीच कठोर वास्तव कविता--

                        घटस्फोटही वाजत गाजत केला साजरा
                       ----------------------------------

कर्तव्य बजावले आई वडिलांनी नेक
शिक्षण दिले, मायेने वाढवली लेक
पालन पोषण केले, काही कमी नाही पडू दिले,
नयनांची तारका, त्यांची ही लेक सुरेख

वयोपरत्त्वे विवाह करून दिला लेकीचा
समारंभ होता मोठ्या धुमधडाक्याचा
लाडकी लेक चालली सासरला,
वर्षाव होत होता तीजवरी अश्रूंचा

परंतु सासरी काहीतरी बिनसले
नवऱ्याचे कुठेतरी घोडे अडले
नीट नांदवले नाही मुलीला,
मुलीवर भलते सलते आरोप केले

आईवडिलांच्या डोळ्यातील पाणी थांबेना
रात्रीची डोळ्यांवर निज येईना
मुलीच्या काळजीने चिंताक्रांत दोघेही,
अन्नही दोघांना गोड लागेना

शेवटी नवऱ्याने सोडचिट्ठी दिली
निष्ठुर मनाने फारकत दिली
समाजात जोवर निर्दयी भरलेत,
तोवर नरक यातनाच भोगतात मुली

वडिलांनी विचाराअंती निर्णय घेतला
लाडक्या मुलीला माहेरी थारा दिला
वाजत गाजत आणले पुन्हा तिला घरा,
आणताना सन्मान केला तिचा पुरा

ज्या हातांनी तिला डोलीत बसवले
त्याच हातांनी पुन्हा घरी आणले
मोठ्या थाटामाटात केला होता विवाह,
तेवढ्याच थाटामाटाने तिला गृही आणले

वडिलांच्या डोळा आता पाणी नव्हते
ते तिला आयुष्यभर सांभाळणार होते
पुन्हा नाही तिचे लग्न करायचे,
पक्का इरादा ते आता करणार होते

या बापाने एक मिसाल आपल्याला दिलीय
मुलगी बापाचे ओझे कधीच नाही झालीय
आईवडिलांची जबाबदारी असतात त्यांची मुले,
त्यांची जबाबदारी त्यांनी शेवटपर्यंत पाळलीय

धन्य ते वडील, आणि धन्य ती त्यांची मुलगी
समाजापुढे त्यांनी एक उत्तम उदाहरण ठेवलेय
पुरुषांची मुजोरी, मुस्कटदाबी चालू देणार नाही,
मुलगी म्हणजे काही पुरुषाची दासी नाही

मनापासून सलाम माझा त्या आई वडिलांना
ज्यांनी घटस्फोटातही मुलीला वाजत गाजत घरी आणले
यापुढे नाही चालणार पुरुषांची मुजोरी, मक्तेदारी,
या बापाने पुन्हा मुलीला तिचे हक्क दिले, आपलेपण दिले.

--श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
--दिनांक-02.11.2023-गुरुवार. 
=========================================