दिन-विशेष-लेख-मराठी रंगभूमी दिन

Started by Atul Kaviraje, November 05, 2023, 11:21:58 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                    "दिन-विशेष-लेख"
                                   "मराठी रंगभूमी दिन"
                                  --------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-05.11.2023-रविवार आहे. 0५-नोव्हेंबर, हा दिवस "मराठी रंगभूमी दिन" म्हणूनही ओळखला जातो. वाचूया, तर या दिवसाचे महत्त्व, आजच्या या "दिन-विशेष-लेख" या शीर्षकI-अंतर्गत.

     दरवर्षी ५ नोव्हेंबर हा दिवस मराठी रंगभूमी दिन म्हणून साजरा केला जातो. विष्णूदास भावे यांनी १८४३ साली सीता स्वयंवर हे पहिले नाटक सांगली येथे रंगभूमीवर सादर करून मराठी नाट्यसृष्टीचा पाया घातला.

           मराठी रंगभूमी दिन--

     विष्णुदास भावे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सांगलीची 'अखिल भारतीय नाट्य विद्यामंदिर समिती' ही १९६० सालापासून 'विष्णुदास भावे गौरवपदक' देत आली आहे. सांगली येथील ही समिती व राज्य मराठी नाटय परिषद यांच्यातर्फे दरवर्षी या दिवशी हे मानाचे पदक दिले जाते. मराठी रंगभूमीचे आद्य नाटककार विष्णुदास भावे यांच्या नावाचे गौरव पदक, ११ हजार रुपये रोख व स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप असते. मराठी रंगभूमीवर प्रदीर्घ सेवा करणार्‍या ज्येष्ठ कलाकारास हे गौरव पदक देण्यात येऊन सन्मानित करण्यात येते. आत्तापर्यंत हा पुरस्कार वसंत कानेटकर, पु.श्री.काळे, मास्टर कृष्णराव, दुर्गा खोटे, छोटा गंधर्व, केशवराव दाते, प्रभाकर पणशीकर, मामा पेंडसे, भालचंद्र पेंढारकर, नानासाहेब फाटक, हिराबाई बडोदेकर, बालगंधर्व, विश्राम बेडेकर, ज्योस्ना भोळे, ग.दि.माडगूळकर, बापूराव माने, माधव मनोहर, शरद तळवलकर, (१९९५), दिलीप प्रभावळकर (२००७), रामदास कामत (२००८), शं.ना. नवरे (२००९), फैय्याज इमाम शेख (२०१०), रत्नाकर मतकरी (२०११), अमोल पालेकर(२०१२), महेश एलकुंचवार (२०१३), डॉ.जब्बार पटेल (२०१४) आदींना मिळाला आहे.

     नाटक हे फक्त मनोरंजनाचं माध्यम नाही, तर ते अभिव्यक्तीचंही माध्यम आहे. आज ज्या ठिकाणी नाटक सादर केलं जातं, त्या रंगभूमीला तसा खूप मोठा इतिहास आहे. दरवर्षी ५ नोव्हेंबर हा दिवस 'मराठी रंगभूमी दिन' म्हणून साजरा केला जातो. विष्णूदास भावे यांनी १८४३ साली 'सीता स्वयंवर' हे पहिलं नाटक सांगलीमध्ये रंगभूमीवर सादर करून मराठी नाट्यसृष्टीचा पाया घातला. पुढं १९४३ साली याच घटनेचं स्मरण म्हणून या क्षेत्रातली अनेक नामवंत मंडळी एकत्र आली आणि सांगलीमध्ये ५ ते ७ नोव्हेंबर या कालावधीत शताब्दी महोत्सव साजरा करण्यात आला. या निमित्तानं ५ नोव्हेंबर रोजी नाट्य संमेलन पार पडलं. या संमेलनाचे अध्यक्ष वि. दा. सावरकर होते.

     त्यानंतर एक समिती स्थापन करण्यात आली आणि ५ नोव्हेंबर हा दिवस मराठी रंगभूमी दिन म्हणून साजरा करण्यासंदर्भात ठराव करण्यात आला. तेव्हापासून ५ नोव्हेंबर हा दिवस दरवर्षी 'मराठी रंगभूमी दिन' म्हणून साजरा केला जातो. चिंतामणराव पटवर्धन यांनी दिलेल्या जागेवर विष्णूदास भावे यांच्या स्मरणार्थ त्यांच्या नावाने नाट्यमंदिर उभारण्यात आलं. या महत्त्वाच्या क्षणी सर्व नाट्य रसिकांच्या साक्षीने सांगलीमध्ये समितीने ठराव करून ५ नोव्हेंबर हा दिवस मराठी रंगभूमी दिन म्हणून जाहीर केला.

     याच दिवशी 'अखिल महाराष्ट्र नाट्यविद्या मंदिर समिती'कडून मराठी रंगभूमीवर दीर्घकाळ सेवा करणाऱ्या ज्येष्ठ कलाकाराला 'विष्णूदास भावे गौरव' पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला जातो. गौरव पदक, ११ हजार रुपये रोख व स्मृतिचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. आत्तापर्यंत हा पुरस्कार बालगंधर्व, भालचंद्र पेंढारकर, महेश एलकुंचवार, माधव मनोहर, मामा पेंडसे, मास्टर कृष्णराव, रत्नाकर मतकरी, रामदास कामत, वसंत कानेटकर, विश्राम बेडेकर, अमोल पालेकर, केशवराव दाते, ग.दि. माडगूळकर, छोटा गंधर्व, डॉ.जब्बार पटेल, जयंत सावरकर, ज्योस्ना भोळे, दाजी भाटवडेकर, दिलीप प्रभावळकर, दुर्गा खोटे, नानासाहेब फाटक, प्रभाकर पणशीकर, पु.श्री.काळे, फैयाज, बापूराव माने, शरद तळवलकर, शं.ना. नवरे, हिराबाई बडोदेकर,मोहन जोशी आदी कलाकारांना मिळाला आहे. यंदाचा हा पुरस्कार सतीश आळेकर यांना जाहीर करण्यात आला आहे.

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-05.11.2023-रविवार.
=========================================