कविता मनातल्या-मुकलो मी मायेच्या आधाराला…

Started by Atul Kaviraje, November 05, 2023, 09:51:27 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                    "कविता मनातल्या"
                                   ------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया "कविता मनातल्या" या काव्य सदरI अंतर्गत, आई या विषयावर एक कविता. या कवितेचे शीर्षक आहे- "मुकलो मी मायेच्या आधाराला..."

                             "मुकलो मी मायेच्या आधाराला..."
                            ------------------------------

आई, गेलीस तू सोडून मला
आणि मी...
मायेच्या आधाराला मुकलो
आज खंत मनात माझ्या
नाही तुला थांबवु शकलो

क्रूर त्या विध्यात्याने
नेले बाबांना ओढून
आजारी तुझ्या आधाराची
काठी गेली मोडून
तुझी काठी बनण्यात
वाटतंय कमी पडलो
माफ कर ग आई मला
असेन जर थोडा चुकलो
आज खंत मनात माझ्या
नाही तुला थांबवु शकलो

तू लपवलंस ह्रुदयात
दूःखाच्या त्या पहाडाला
अंश तुझा मी तरीही
नाही समजु शकलो तुला
मी वेड्यासारखं माझंच दूःख
होतो ग कुरवाळत बसलो
तुझ्या उदासी जवळ बसुन
नव्हतो मोकळं हसलो
आज खंत मनात माझ्या
नाही तुला थांबवु शकलो

प्रामाणिक मी जागत होतो
बाबांना दिलेल्या वचनाला
तुला जगवण्यासाठी मी,
माझं सर्वस्व लावलं पणाला
पण क्रूर त्या नियतीपुढे
बेबस मी कोलमडलो
तुझ्या आठवणींनी आई,
कितीतरी रात्री मी रडलो
तुझी आठवण काढत काढत
ओल्या डोळ्यांनी झोपलो
आज खंत मनात माझ्या
नाही तुला थांबवु शकलो

--डौ. सुभाष कटकदौंड
---------------------

            (साभार आणि सौजन्य-संदर्भ मराठी कविता मनातल्या.वर्डप्रेस.कॉम)
           -----------------------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-05.11.2023-रविवार.
=========================================