कविता मनातल्या-शेवटचा निरोप

Started by Atul Kaviraje, November 08, 2023, 09:24:23 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                   "कविता मनातल्या"
                                  ------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया "कविता मनातल्या" या काव्य सदरI अंतर्गत, आई या विषयावर एक कविता. या कवितेचे शीर्षक आहे- "शेवटचा निरोप"

                                    "शेवटचा निरोप"
                                   ----------------

बाबा गेले अचानक देवाघरी
अन् आई गेली खचून
भरल्या घरात झाली ती एकाकी
सारं दूःख गेलं साचून

डोळे केले कोरडे तिने
नाही पुन्हा कधी रडली
जिवनाचा हात घट्ट पकडून
बळे बळे होती उठली

नव्या उमेदीने राहिली उभी
वाटलं आता ती सावरली
थांबलेल्या जिवनाची गाडी
पुन्हा धावू लागली

कोणा नाही कळले
असे कसे विपरीत घडले
चालत्या बोलत्या आईने
अचानक अंथरुण धरले

होती वेडी आशा मला कि
ती आता उठेल
वाटलं नव्हतं तिची साथ
फक्त इतकीच टिकेल

तिच नेमकं काय म्हणनं होतं
मला समजलं नव्हतं
तिला जाण्याची का घाई झाली
कोडं उमगलं नव्हतं

अचल तिच्या हातावर
जेंव्हा अश्रु माझे पडले
डोळे उघडले होते तिने
अन् ओठ होते थरथरले

माझा धरलेला हात
तिने तेंव्हा घट्ट दाबला होता
फसलो ग मी आई,
तो तर तुझा...
शेवटचा निरोप होता

--डौ. सुभाष कटकदौंड
---------------------

            (साभार आणि सौजन्य-संदर्भ मराठी कविता मनातल्या.वर्डप्रेस.कॉम)
           -----------------------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-08.11.2023-बुधवार.
=========================================