अनोळखी मैत्रीण

Started by Lekhani, November 09, 2023, 05:34:23 PM

Previous topic - Next topic

Lekhani

खूप मैत्रिणी मिळतील मला
पण तुझ्यासारख्या मैत्रीण मिळणार नाही
म्हणायला तर खूप नाती असतात
पण आपल्या मैत्री च्या नात्यासारख नात नाही
भांडण तर खूप केले
पण
संकटात विश्वास देणारी तुझ्या सारखी मैत्रीण नाही
रागावण्याचा बहाणा
तुला थोडाफार जमे
आपल्या माणसांशिवाय
तुला कधीच न कर्मे
प्रत्येकाची नाही म्हंटल
तरी रिकामी ओंजळ भरते
अशी मैत्रिण मिळायला
खूप भाग्य लागते
तुझ्यामैत्रीचा राहीन
आयुष्यभर रुनी
कारण लाखो येतील आयुष्यात
पण तुझ्यासारखी न कुणी

निखिल भडेकर
09/11/2023