वसुबारस-चारोळी

Started by Atul Kaviraje, November 09, 2023, 10:20:33 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje


                                       "वसुबारस"
                                      -----------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-०९.११.२०२३-गुरुवार आहे. आज "वसुबारस" आहे. भरपूर कृषी उत्पादन व्हावे, आपल्या मुला-बाळांना चांगले आरोग्य मिळावे आणि सुख लाभावे म्हणून वसुबारसची पूजा केली जाते. या दिवशी संध्याकाळी घरातील तुळशीपुढे आणि दारात, परिसरात पणत्या लावून रोषणाई करण्याची पद्धत आहे. अशा प्रकारे हा अत्यंत साधा विधीपूर्वक करण्याचा हा दिवस आहे. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी, कवी-कवियत्रींना या वसुबारस आणि दिवाळी सणाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया, वसुबारसची एक चारोळी--

स्नेहाच्या दिव्यात तेवते वात तेजाची
वसुबारस म्हणजे पूजा धेनु वासराची
दिवाळीचा पहिला दिवस वसुबारस आला,
दिवाळीच्या मंगलमय शुभेच्छा घेऊन आला. 

                      (साभार आणि सौजन्य-संदर्भ-झीन्युज.इंडिया.कॉम)
                     --------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-09.11.2023-गुरुवार.
=========================================