वसुबारस-हार्दिक शुभेच्छा

Started by Atul Kaviraje, November 09, 2023, 10:23:03 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                        "वसुबारस"
                                       -----------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-०९.११.२०२३-गुरुवार आहे. आज "वसुबारस" आहे. भरपूर कृषी उत्पादन व्हावे, आपल्या मुला-बाळांना चांगले आरोग्य मिळावे आणि सुख लाभावे म्हणून वसुबारसची पूजा केली जाते. या दिवशी संध्याकाळी घरातील तुळशीपुढे आणि दारात, परिसरात पणत्या लावून रोषणाई करण्याची पद्धत आहे. अशा प्रकारे हा अत्यंत साधा विधीपूर्वक करण्याचा हा दिवस आहे. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी, कवी-कवियत्रींना या वसुबारस आणि दिवाळी सणाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया, वसुबारसच्या हार्दिक शुभेच्छा--

           वसुबारसनिमित्त प्रियजनांना द्या खास शुभेच्छा--

     Vasubaras 2023 : दिवाळीची पहिली पणती 9 नोव्हेंबर रोजी गाय वासरांसाठी लावली जाणार आहे. वसुबारस म्हणजेच गोवत्स द्वादशी. वसुबारसच्या पूजेपासून खऱ्या अर्थाने दिवाळीच्या सणाला सुरुवात होते. या सणाचा आनंद वाढवण्यासाठी आपल्या प्रियजनांना सोशल मीडियावरुन विशेष शुभेच्छा द्या.

         वसुबारसनिमित्त शुभेच्छा--

=========================================
गाय आणि वासराच्या अंगी असणारी

वातसल्यता, उदारता, प्रसन्नता आणि समृद्धी

हे सर्व आपणास लाभो....

वसुबारसच्या हार्दिक शुभेच्छा



वसुबारस या शब्दातील वसू

म्हणजे धन त्यासाठी

असलेली बारस म्हणजे द्वादशी

वसुबारसच्या हार्दिक शुभेच्छा



स्वदुग्धे सदा पोशिते जी जगाला,

स्वपुत्रास दे जी कृषी चालवाया..

परमपुज्य जी वंद्य या भारताला,

नमस्कार त्या दिव्य गो देवतेला..

वसुबारसेच्या हार्दिक शुभेच्छा..!



स्नेहाच्या दिव्यात तेवते वात तेजाची

वसु बारस म्हणजे पूजा धेनु वासराची

दिवाळीचा पहिला दिवस

वसुबारस सणानिमित्त शुभेच्छा...



आजपासून सुरु होणाऱ्या दिवाळी सणाच्या आपणास

व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा!

वसुबारसच्या हार्दिक शुभेच्छा !
=========================================

--Published by:Shweta Shigvan-Kavankar
-----------------------------------------------

                      (साभार आणि सौजन्य-संदर्भ-लोकशाही.कॉम)
                     ----------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-09.11.2023-गुरुवार.
=========================================