कविता मनातल्या-आई माझी रूसली…

Started by Atul Kaviraje, November 09, 2023, 10:38:50 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                    "कविता मनातल्या"
                                   ------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया "कविता मनातल्या" या काव्य सदरI अंतर्गत, आई या विषयावर एक कविता. या कवितेचे शीर्षक आहे- "आई माझी रूसली..."

                                "आई माझी रूसली..."
                               ---------------------

गोष्टी ऐकायला कोणी नाही
म्हणुन आई माझी रूसली
माझ्याकडे पाहून तेंव्हा
अगदी उदास कोरडं हसली.

नंतर माहित नाही कसे
तिने हात पाय गाळले
खचली ती अन् तिने
कायमचे अंथरुण धरले.

जणु तिची जगण्याची
ईच्छाच होती मेली
मरणाकडे डोळे लावून
वाट पहात राहिली.

एका रात्री बाबा येऊन
माझ्या अगदी जवळ बसले
अस्वस्थ मला बघून
त्यांचे डोळे दूःखाने भरले.

दूसऱ्या दिवशी संध्याकाळी
बाबा नजर चुकवून आले
अन् कोणालाही न सांगता
आईला ते घेऊन गेले.

स्वर्गात आता आई तू
अगदी सुखात असशील
तुझ्या जवळच्या छान गोष्टी
सर्वांना सांगत असशील.

एकांतात बसतो ग मी
पुसत डोळ्यातलं पाणी
तुझी ती प्रेमळ हाक
अजुन ही येते ग काणी.

माहित आहे ग आई मला
तू आता येणार नाहीस
आणि वेळ आल्याशिवाय
मला घेऊन जाणार नाहीस.

कोण कोणासाठी आणि
किती दिवस ग रडतो
आई, तुझ्या गोष्टी आठवत
मी ही आता जगतो.

--डौ. सुभाष कटकदौंड
---------------------

           (साभार आणि सौजन्य-संदर्भ मराठी कविता मनातल्या.वर्डप्रेस.कॉम)
          -----------------------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-09.11.2023-गुरुवार.
=========================================