खरंच आणखी एक मन पाहिजे होत गं....

Started by अतुल देखणे, November 11, 2010, 05:21:25 PM

Previous topic - Next topic

अतुल देखणे

खरंच आणखी एक मन पाहिजे होत गं....



खरंच आणखी एक मन पाहिजे होत गं,
तुझ्या मनाचा मार्ग मला दाखवणारं....

निशब्द माझ्या भावनांना तुझ्या मनाचा स्पर्श देणारं,
हळव्या या माझ्या हृदयाला तुझ्या आसवांची साथ देणारं
खरंच आणखी एक मन पाहिजे होत गं....

कधी माझ्या या अर्धवट कवितांना तुझ्या शब्दांची साथ देणारं,
तर कधी याच कवितेतील भाव तुझ्यापर्यंत पोहोचवणारं
खरंच आणखी एक मन पाहिजे होत गं....

माझ्या डोळ्यातील तुझे अश्रू टिपणारं,
तर कधी त्याच अश्रूंचा हिशोब तुला मागणारं
खरंच आणखी एक मन पाहिजे होत गं....

दिल्या शब्दांचे घाव मोजणारं,
आणि त्यावर पुन्हा तुझ्याच मायेचं पांघरून घालणारं
खरंच आणखी एक मन पाहिजे होत गं....


खरंच आणखी एक मन पाहिजे होत गं,
तुझ्या मनाचा मार्ग मला दाखवणारं....


---- अतुल देखणे ----

PRASAD NADKARNI



Abhishek Vaze

खरंच आणखी एक मन पाहिजे होत... :(
manatala agadi yogya shabdat mandalas tu mitra.

santoshi.world

खरंच आणखी एक मन पाहिजे होत .... very true :)

mestrymahesh4@gmail.com

खरंच आणखी एक मन पाहिजे होत गं.................

ase zale aste tar kadhich konacha break off zala nasta