धनत्रयोदशी-कविता-दिवाळी

Started by Atul Kaviraje, November 10, 2023, 10:23:46 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                      "धनत्रयोदशी"
                                     -------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१०.११.२०२३-शुक्रवार आहे. आज "धनत्रयोदशी" आहे. दिवाळी हा आनंदाचा आणि उत्साहाचा सण आहे. या अगोदरचा सण म्हणजे धनत्रयोदशी किंवा धनतेरस हा आहे. इंद्राने जेव्हा असुरांना बरोबर घेऊन समुद्र मंथन केले, तेव्हा त्यातून या दिवशी देवी लक्ष्मी प्रगट झाली. त्याच वेळी समुद्रातून धन्वंतरी अमृतकुंभ बाहेर घेऊन आला. म्हणून धन्वंतरीचीही या दिवशी पूजा केली जाते. म्हणून या दिवसास धन्वंतरी जयंती असेही म्हणतात. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी कवी-कवियत्रीस धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया, धनत्रयोदशीवर एक कविता.

                                      "दिवाळी"
                                     ----------

दिपावलीचा पहिला दिवस

असे ही वसुबारस

पुजती सारे या दिनी

गाईसह तिचे पाडस


    धन्वंतरीची पुजा अन्

    करुनी यमदीपदान

    धनत्रयोदशी च्या दिनी

    धनपूजनाला असतो मान


नरकासुराचा वध केला

त्या श्रीकृष्णाचे स्मरण

नरकचतुर्दशीच्या दिनी

होते अलक्ष्मीचे मर्दन


     पाटाभोवती रांगोळी

     हळदी कुंकू वाहून

     आश्विन अमावास्येला

     करिती लक्ष्मी पूजन


बलिप्रतिपदा म्हणजे पाडवा

नववर्षाची सुरूवात

बळीराजाचे पुजन अन्

पत्नीचे पतीला औक्षण


    बहीण भावाच्या नात्याचा सण

    भाऊबीज म्हणती सर्वजण त्यास

    बीजेच्या कोरीसम बंधूप्रेम वाढो

    बहिणीच्या मनीची एकच आस

--Savita Kale
---------------

                       (साभार आणि सौजन्य-संदर्भ-स्टोरी मिरर.कॉम)
                      ------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-10.11.2023-शुक्रवार.
=========================================