कविता मनातल्या-मातीचा देह मातीला शरण गेला…

Started by Atul Kaviraje, November 10, 2023, 10:41:39 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                     "कविता मनातल्या"
                                    ------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया "कविता मनातल्या" या काव्य सदरI अंतर्गत, आजी-आजोंबावर एक कविता. या कवितेचे शीर्षक आहे- "मातीचा देह मातीला शरण गेला..."

                            "मातीचा देह मातीला शरण गेला..."
                           --------------------------------

आजी आजोबा थकलेले होते
थकलेल्या वाड्यात रहात होते.

काळाने केला भयानक घात
सारं उद्ध्वस्त झालं भूकंपात

पण पडताना वाड्याने हात टेकले
आजी आजोबांना त्याने वाचविले

जख्मी वाड्याला बघून आजोबा खचले
अगदी थोडया दिवसांतच देवाघरी गेले

आजी मात्र एकटीच राहीली धीराने
वाडा नाही सोडला तिनं हट्टाने

म्हणाली, आहे मी अजून जिवंत मजेनं
या तूम्ही सारी असेच दर वर्षी हौसेनं

आम्हीही अधुन मधुन तिकडे जात राहीलो
वाड्याच्या अंगा खांद्यावर खेळत राहिलो

एके दिवशी आजीने देह सोडला
आणि आमचा उन्हाळा करपून गेला

एकाकी वाडा खूणवत होता
आतूरतेन आम्हाला बोलवत होता.

खचलेल्या वाड्याने मग धीर सोडला
मातीचा देह मातीला शरण गेला.

--डौ. सुभाष कटकदौंड
---------------------

            (साभार आणि सौजन्य-संदर्भ मराठी कविता मनातल्या.वर्डप्रेस.कॉम)
           ----------------------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-10.11.2023-शुक्रवार.
=========================================