११-नोव्हेंबर-दिनविशेष

Started by Atul Kaviraje, November 11, 2023, 10:07:32 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-११ .११.२०२३-शनिवार. जाणून घेऊया,आजच्या दिवसाचे "दिनविशेष"

                                "११-नोव्हेंबर-दिनविशेष"
                               ----------------------

-: दिनविशेष :-
११ नोव्हेंबर
राष्ट्रीय शिक्षण दिन
=========================================
अ) महत्त्वाच्या घटना:
   ----------------
२००४
यासर अराफत यांच्या मृत्यूपश्चात महमूद अब्बास यांची पॅलेस्टाईन मुक्ती संघटने (PLO) च्या अध्यक्षपदी नियुक्ती
१९८१
अँटिगा आणि बार्बुडाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश
१९७५
अंगोलाला स्वातंत्र्य मिळाले.
१९६२
कुवेतने नवीन संविधान अंगीकारले.
१९४७
पंढरपूरचे विठ्ठल मंदिर सर्वांना खुले करण्यात आले. १ मे १९४७ पासून साने गुरुजींनी त्यासाठी काही काळ उपोषण केले होते.
१९४२
दुसरे महायुद्ध – नाझी जर्मनीने फ्रान्सचा कब्जा घेतला.
=========================================
ब) जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  -----------------------------
१९६२
डेमी मूर – अमेरिकन अभिनेत्री, निर्माती, दिग्दर्शिका, गीतलेखिका आणि मॉडेल
१९४२
रॉय फ्रेड्रिक्स
(२२ जून १९७६)
रॉय क्लिफ्टन फ्रेड्रिक्स – वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू
(मृत्यू: ५ सप्टेंबर २०००)
१९३६
माला सिन्हा – हिन्दी, नेपाळी व बंगाली चित्रपट अभिनेत्री
१९२६
बद्रुद्दीन जमालुद्दीन काझी उर्फ 'जॉनी वॉकर' – विनोदी अभिनेता
(मृत्यू: २९ जुलै २००३)
१९२४
रुसी शेरियर मोदी – कसोटी क्रिकेटपटू
(मृत्यू: १७ मे १९९६)
१९११
गोपाळ नरहर तथा 'मनमोहन' नातू – 'लोककवी'
(मृत्यू: ७ मे १९९१)
१८८८
जीवटराम भगवानदास तथा 'आचार्य' कॄपलानी – स्वातंत्र्यसेनानी, गांधीवादी, समाजवादी आणि पर्यावरणवादी
(मृत्यू: १९ मार्च १९८२)
१८८८
मौलाना अबूल कलाम आझाद – स्वातंत्र्यचळवळीतील विद्वान नेते, भारताचे पहिले शिक्षणमंत्री, भारतरत्‍न (१९९२)
(मृत्यू: २२ फेब्रुवारी १९५८)
१८८६
श्रीधर कृष्णाजी कुलकर्णी तथा 'पठ्ठे बापूराव' – रसाळ लावण्या लिहीणारे लावणीसम्राट
(मृत्यू: २२ डिसेंबर १९४५)
१८७२
उस्ताद अब्दुल करीम खाँ
'संगीतरत्‍न' उस्ताद अब्दुल करीम खाँ – किराणा घराण्याचे संस्थापक व सवाई गंधर्वांचे गुरु
(मृत्यू: २७ आक्टोबर १९३७)
१८५१
राजारामशास्त्री भागवत – विद्वान व समाजसुधारक, ज्ञानाच्या क्षेत्रातील मोठे प्रज्ञावंत, शिक्षणविषयक स्वतंत्र ध्येये असल्यामुळे त्यांनी १८८४ मध्ये बॉम्बे हायस्कूल आणि पुढे मराठा हायस्कूल काढले. हिन्दूधर्म विवेचक पत्राचे ते काही वर्षे संपादक होते.
(मृत्यू: ४ जानेवारी १९०८ - मुंबई)
१८२१
फ्योदोर दोस्तोवस्की – रशियन कादंबरीकार आणि तत्त्वज्ञ
(मृत्यू: ९ फेब्रुवारी १८७१)
=========================================
क) मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
    -------------------------
२००५
पीटर ड्रकर – ऑस्ट्रियन अमेरिकन व्यवस्थापन तज्ञ, लेखक
(जन्म: १९ नोव्हेंबर १९०९)
२००४
यासर अराफत – नोबेल पारितोषिक विजेते पॅलेस्टाईनचे नेते
(जन्म: २४ ऑगस्ट १९२९)
१९९९
अरविंद मेस्त्री – शिल्पकार
(जन्म: ? ? ????)
१९९७
यशवंत दत्तात्रय महाडिक ऊर्फ यशवंत दत्त – चित्रपट अभिनेते
(जन्म: ७ नोव्हेंबर १९४५)
१९९४
कुपल्ली वेंकटप्पागौडा पुट्टप्पा उर्फ 'कुवेम्पू' – ज्ञानपीठ विजेते कन्नड लेखक व कवी
(जन्म: २९ डिसेंबर १९०४)
१९८४
मार्टिन ल्यूथर किंग सिनिअर (डॅडी किंग) – मानवाधिकारांसाठी आजीवन संघर्ष करणारे नेते
(जन्म: १९ डिसेंबर १८९७)
=========================================

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-11.11.2023-शनिवार.
=========================================