दिन-विशेष-लेख-राष्ट्रीय शिक्षण दिन

Started by Atul Kaviraje, November 11, 2023, 09:59:49 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                   "दिन-विशेष-लेख"
                                  "राष्ट्रीय शिक्षण दिन"
                                 -------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-11.11.2023-शनिवार आहे.  ११-नोव्हेंबर, हा दिवस "राष्ट्रीय शिक्षण दिन" म्हणूनही ओळखला जातो. वाचूया, तर या दिवसाचे महत्त्व, आजच्या या "दिन-विशेष-लेख" या शीर्षकI-अंतर्गत.

     देशाचे पहिले शिक्षणमंत्री मौलाना अबुल कलाम आझाद (Maulana Abul Kalam Azad) यांचा ११ नोव्हेंबर हा जयंती दिन आहे. ११ नोव्हेंबर २००८ पासून हा दिवस राष्ट्रीय शिक्षण दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय तत्कालीन केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयाने घेतला होता. मौलाना आझाद यांचे शिक्षण क्षेत्रातील योगदान बहुमोल आहे.

         11 नोव्हेंबरला का साजरा करतात राष्ट्रीय शिक्षण दिन ?, जाणून घ्या महत्त्व--

     दरवर्षी 11 नोव्हेंबरला राष्ट्रीय शिक्षण दिन साजरा केला जातो. देशाचे पहिले शिक्षा मंत्री मौलाना अबुल कलाम आझाद((Maulana abul kalam azad birth anniversary) यांची यांच्या जन्मदिनी हा दिवस राष्ट्रीय पातळीवर साजरा केला जातो. शिक्षण क्षेत्रात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.

     भारतामध्ये दरवर्षी 11 नोव्हेंबरला राष्ट्रीय शिक्षण दिन साजरा केला जातो. भारताचे पहिले केंद्रीय शिक्षण मंत्री मौलाना अबुल कलाम आझाद (National Education Day) यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस साजरा केला जातो. ते एक स्वातंत्र्य सैनिक, विद्वान और नामवंत शिक्षणतज्ञ होते आणि स्वंतत्र भारताचे ते प्रमुख वास्तुविशारदांपैकी एक होते. AICTE आणि AICTE सारख्या प्रमुख शिक्षण संस्थांची स्थापना करण्यामध्ये त्यांता मोलाची वाटा आहे.

     भारतामधील मनुष्यबळ विकास मंत्रालयाने सप्टेंबर 2008 मध्ये मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जन्मदिनी राष्ट्रीय स्तरावर शिक्षण दिन साजरा करण्याची घोषणा केली. स्वांतत्र्यनंतर राष्ट्राच्या निर्मितीमध्ये शिक्षण महत्वपूर्ण बनविण्यासाठी देशातील नेत्यांनी आपले लक्षक् शिक्षणावर केंद्रीत केले. विशेष रुप से अबुल कलाम यांनी हे लक्ष्य प्राप्त करण्यामध्ये अग्रणी भूमिका निभावलेली आहे.

   राष्ट्रीय शिक्षण दिनाचे महत्त्व (Significance of National Education Day)--

     राष्ट्रीय शिक्षण दिनी (National Education Day) राष्ट्र निर्माणमध्ये मौलाना आझाद यांचे योगदानाचे देशातील नागरिक स्मरण करतात. हा दिवस स्वतंत्र भारतातील शिक्षा प्राणालीचा पाया रचणाऱ्या अबुल कलमा यांचे महत्त्वपूर्ण योगदानाचे स्मरण करण्यासाठी साजरा केला जातो. या दिवशी देशीतील शाळेत विविध रंजक आणि माहितीपूर्ण सेमीनार, परिसंवाद,निबंध-लेखन असे कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. विद्यार्थी आणि शिक्षक साक्षरतेचे महत्त्व आणि शिक्षणाचे सर्व पैलूंवर चर्चा करतात.

     देशभरात शाळा आणि कॉलेमध्ये 11 नोव्हेंबरला निंबध लेखन, वाद-विवाद आणि इतर स्पर्धा आयोजित केल्या जातात. शिक्षणासाठी अनेक इमारती, स्मारक आणि केंद्रांची स्थापन केली आहे.

--By-टीम ई सकाळ
-------------------

                        (साभार आणि सौजन्य-संदर्भ-इसकाळ.कॉम)
                       ---------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-11.11.2023-शनिवार.
=========================================

CHECK OUT MY SOCIALS -

INSTAGRAM - https://instagram.com/atul_chya_kavita
PINTEREST - https://www.pinterest.com/chyakavitaatul55/
TWITTER(X)- https://twitter.com/AtulChyaKavita
YOUTUBE   - https://www.youtube.com/@atulchyakavita4928/videos
FACEBOOK  - https://www.facebook.com/atulchyakavita
=========================================