नरक चतुर्दशी-हार्दिक शुभेच्छा

Started by Atul Kaviraje, November 12, 2023, 09:52:56 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                    "नरक चतुर्दशी"
                                   ---------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१२.११.२०२३-रविवार आहे. आज "नरक चतुर्दशी" आहे. ही कार्तिक कृष्ण चतुर्दशी आहे आणि तिला नरक चौदस आणि काली चौदस असेही म्हणतात. नरक चतुर्दशी, ज्याला रूप चौदस असेही म्हणतात, दिवाळी महापर्वाच्या दुसऱ्या दिवशी साजरी केली जाते. या दिवशी अभ्यंगस्नान करण्याची परंपरा आहे. या दिवशी शुभ मुहूर्तावर स्नान केल्याने नरकाच्या भयापासून मुक्ती मिळते, अशी धार्मिक श्रद्धा आहे. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण, कवी-कवियत्रींना नरक चतुर्दशी आणि दिवाळीच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया नरक चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा.

         नरक चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा--

=========================================
जसा श्री कृष्णाने नरकासुरचा नाश केला.. त्याच प्रमाणे आपल्या जीवनातून दुखाचा नाश होवो..
नरक चतुर्दशी च्या हार्दिक शुभेच्छा

पहाटेच करता सुगंधी अभ्यंगस्नान कुविचार सरती दूर अन् श्रीकृष्णाचे होई स्मरण...
नरक चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा !!

उटण्याचा नाजुक सुगंध घेऊन आली आज पहिली पहाट पणतीतल्या दिव्याच्या तेजानी उजळेल आयुष्याची वहिवाट नरक चतुर्दशी दीपावलीच्या तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला हार्दिक शुभेच्छा

दत्तो दीप: चतुर्दश्यां नरक प्रीतये मया ,चतु वती समायु सर्वपापापनुत्तये ,
नरक चतुर्दशी आणि दिवाळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा..!!!

देवी काळी माता तुम्हास व तुमच्या कुटुंबियांना नेहमी वाईट नजरे पासून वाचवेल अशी आमची शुभ कामना. नरकचतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा

नरक चतुर्दशी आणि दिवाळीनिमित्त मंगलमय शुभेच्छा! सत्याचा असत्यावर नेहमीच प्रभाव असावा.. अन्यायाचा प्रतिकार करण्याचं बळ आपल्याला लाभो ! आपल्याकडून नेहमी सत्कर्म घडो ! आपणास स्वर्गसुख नित्य लाभो !!
हि दिवाळी तुम्हा सर्वांना सुखसमृद्धी आणि भरभराटीची जावो..

नरक चतुर्दशी दिनी ,अभयंग स्नान करुनी, दीप उजाळुनी आपणास व आपल्या परिवारास नरकचतुर्दशीच्या व  दिपावलीच्या हार्दीक शुभेच्छा देउन, आनंद व्यक्त करतो मनी शुभ दिपावली !!!!

नरकासुराचा वध झाला नरकचतुर्दशीला अभ्यंग स्नान करुनी स्मरावे श्रीकृष्णाला !
नरक चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा!

" या दिवशी भगवान श्री कृष्णांनी नरकासुराचा वध केला होता. आपल्या सर्वांच्याही आयुष्यात दुःखरूपी व दुर्गुणरूपी नरकासुराचा नाश होवो, ही सदिच्छा!"
=========================================

                      (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी भाषण.कॉम)
                     -------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-12.11.2023-रविवार.
========================================

CHECK OUT MY SOCIALS -

INSTAGRAM - https://instagram.com/atul_chya_kavita
PINTEREST - https://www.pinterest.com/chyakavitaatul55/
TWITTER(X)- https://twitter.com/AtulChyaKavita
YOUTUBE   - https://www.youtube.com/@atulchyakavita4928/videos
FACEBOOK  - https://www.facebook.com/atulchyakavita
=========================================