लक्ष्मीपूजन-माहिती-1

Started by Atul Kaviraje, November 12, 2023, 10:05:34 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje


                                      "लक्ष्मीपूजन"
                                     -------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१२.११.२०२३-रविवार आहे. आज "लक्ष्मीपूजन" आहे. श्री लक्ष्मीपूजनाच्या वेळी अक्षतांनी बनवलेले अष्टदल कमल किंवा स्वस्तिक यांवरच श्री लक्ष्मीची स्थापना केली जाते. त्यानंतर लक्ष्म्यादी देवतांना लवंग, वेलची आणि साखर घालून तयार केलेल्या गायीच्या दुधाच्या खव्याचा नैवेद्य दाखवतात. धने, गूळ, साळीच्या लाह्या, बत्तासे इत्यादी पदार्थ लक्ष्मीला वाहून नंतर ते आप्तेष्टांना वाटतात. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण, कवी-कवियत्रींना लक्ष्मीपूजन आणि दिवाळी सणाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया, लक्ष्मीपूजनIवर महत्त्वाची माहिती.

           लक्ष्मीपूजन हा सण का साजरा केला जातो ?--

     हिंदू धर्मातील दिवाळी हा सण सर्वात महत्त्वाचा आहे. लक्ष्मीपूजन आश्विन अमावास्येला म्हणजेच दिवाळीच्या दिवशी संध्याकाळी केले जाते. लक्ष्मी ही फार चंचल असते असा समज आहे. त्यामुळे शक्यतोवर हिंदू शास्त्राप्रमाणे लक्ष्मीपूजन हे स्थिर लग्नावर करतात. त्याने लक्ष्मी स्थिर राहते असा समज आहे. अनेक घरात श्रीसूक्त पाठही केले जाते. तसेच व्यापारी लोक आपल्या हिशोबाचे पुस्तक याची सुद्धा पूजा करतात तसेच येथून नवीन वर्ष लक्ष्मी पूजनापासून सुरू होते.

     पाटावर रांगोळी काढून तांदूळ ठेवतात. त्यावर वाटी किंवा तांदूळ ठेवतात. त्यात सोन्याचे दागिने, चांदीचा रुपया दागिने ठेवून त्यांची पूजा करतात. हा दिवस व्यापारी लोक फार उत्साहात साजरा करतात. या दिवशी स्वच्छता करण्यासाठी लागणारी नवीन झाडू विकत घेतात तिलाच लक्ष्मी मानून तिच्यावर पाणी घालून, हळद-कुंकू वाहून घरात वापरण्यास सुरुवात करतात. लक्ष्मी पूजनाचा दिवस हा दिवाळीचा दिवस असतो. त्या दिवशी अमावस्या असते.

     लक्ष्मीपूजन हे हिंदू धर्मातील स्त्रिया मोठ्या आनंदाने व उत्साहाने साजरा करतात. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी दिवे लावून सर्व स्त्रिया मुले आनंदी असतात व त्या दिवशी दिपोत्सव साजरा केला जातो व लक्ष्मीचे पूजन करतात. एका लाकडी पाटावर गुलाबाच्या पाकळ्या ठेवून किंवा झेंडूच्या फुलांच्या पाकळ्या ठेवून अक्षदांचे स्वस्तिक काढतात. या श्री लक्ष्मी व श्री कुबेराची मूर्ती यांची मनोभावाने पूजा करतात. लक्ष्मी ही संपत्तीची देवता आहे. तर कुबेर हा संपत्ती रक्षक आहे.

     आपल्याला पैसा कमविण्याची कला साध्य असते. पण कमवलेला पैसा कसा जवळ राखावा हे कुबेर शिकवतो. म्हणून व्यापारी लोक या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी कुबेराची पूजा करतात. लक्ष्मीला घरात पसारा, अस्वच्छता आवडत नाही. जिथे टापटीप असते, तिथे तीला राहायला आवडते. वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिले तर केवळ टापटीपपणा म्हणजेच सुंदर असे नाही. तर ज्या व्यक्तीचे आचरण शुद्ध असते, मनात चालकपड किंवा मोह विकार व अवगुण नसतात, जो व्यक्ती आपला व्यवहार अतिशय कुशलतेने प्रामाणिकपणे करतो. ती व्यक्ती लक्ष्मी व कुबेरला प्रिय असते.

             लक्ष्मीपूजनाचे महत्व :--

     लक्ष्मीपूजनाचे व्यापारी वर्गातही खूप महत्त्व आहे. तसेच सामान्य मनुष्य सुद्धा हिंदू धर्मातील देवी-देवतांची पूजा करत असतो. परंतु दिवाळीच्या दिवशी संध्याकाळी माता लक्ष्मीची पूजा केली जाते. याच दिवसापासून व्यापारी वर्गाचे हिशोबाचे नवीन वर्ष सुरू होते. तसेच दुकानाची सजावटही करून लक्ष्मी आणि कुबेराचे पूजन या दिवशी केली जाते. घरातील संपत्ती, लॉकर सर्व खुले केले जातात.

     लक्ष्मीपूजनाच्या दिवशी झाडूची पूजा केली जाते. तिच्यावर पाणी, हळद-कुंकू वाहून घरात वापरण्यास सुरुवात करतात. नाशिकमध्ये वर्षानुवर्षे दिवाळीतील इतर विक्रीते त्याप्रमाणेच झाडू फळा विक्रीते देखील परराज्यातून दाखल होऊन विक्री करतात. आधीच्या काळात रात्री कुबेर पूजन करण्याची प्रथा होती. कुबेर हा खजिनदार आणि संपत्तीचा स्वामी मानला जातो. दीप प्रज्वलन करून यक्ष आणि त्यांचा अधिपती कुबेराला निमंत्रित करून पूजन हा मूळ संस्कृतिक कार्यक्रम होता.

     परंतु गुप्तकाळात वैष्णव पण त्याला राजाश्रय मिळाल्याने आधी कुबेरा बरोबर लक्ष्मीची पूजा होऊ लागली. विविध ठिकाणी झालेल्या उत्खननात कुशान काळातील अनेक मूर्ती सापडल्या आहेत. त्यामध्ये कुबेर आणि लक्ष्मी एकत्र आहेत. काही मूर्तींमध्ये कुबेर त्यांची पत्नी सह दाखवला आहे. यावरून असे दिसते की प्राचीन काळी कुबेर आणि त्याची पत्नीची सुद्धा पूजा केली जात होती. कालांतराने इरीतीची जागा लक्ष्मी व कुबेरा जागी गणपतीला प्रतिष्ठित केले गेले.

     लक्ष्मी म्हणून ज्या देवतेला मध्यरात्री हाकलून देण्याची प्रथा आहे. तीच खरी या सणाची इष्टदेवता असल्याचेही म्हटले जाते. तिला जेष्ठा, षष्टी व सटवी, निऋत्ती या नावाने ओळखतात. निऋत्ती ही सिंधू संस्कृतीतील मातृदेवता समजली जाते. तिला ब्राह्मणी संस्कृतीने अलक्ष्मी म्हणून मान्य केले, तरी ती राक्षसांची लक्ष्मी आहे, असे देव मानत असल्याचे उल्लेख दुर्गासप्तशती मध्ये आहे. हेच महत्त्व आपल्याला दिसून येते.

--प्रमोद तपासे
-------------

                       (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी मोल.कॉम)
                      ------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-12.11.2023-रविवार.
=========================================

CHECK OUT MY SOCIALS -

INSTAGRAM - https://instagram.com/atul_chya_kavita
PINTEREST - https://www.pinterest.com/chyakavitaatul55/
TWITTER(X)- https://twitter.com/AtulChyaKavita
YOUTUBE   - https://www.youtube.com/@atulchyakavita4928/videos
FACEBOOK  - https://www.facebook.com/atulchyakavita
=========================================