बलिप्रतिपदा-शुभेच्छा

Started by Atul Kaviraje, November 14, 2023, 07:49:30 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                     "बलिप्रतिपदा"
                                    -------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१४.११.२०२३-मंगळवार आहे. आज "बलिप्रतिपदा" आहे. राजा बळीला भगवान विष्णूकडून अमर होण्याचे वरदान मिळाले आहे. त्यांची पूजा केल्याने जीवनात सुख-समृद्धी येते आणि प्रत्येक कार्य सिद्धीस जाते, असे मानले जाते. यंदा दिवाळी पाडवा आणि बलिप्रतिपदा एकाच दिवशी साजरा केला जाणार आहे. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी, कवी-कवियत्रींना बलिप्रतिपदा आणि दिवाळी सणाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया, बलिप्रतिपदेच्या शुभेच्छा.

     आज दिवाळी पाडवा (बलिप्रतिपदा) साजरा केला जाणार आहे. यानिमित्ताने आपण आपल्या मित्र-मैत्रिणींना दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा जरुर पाठवा.

     विविध रंगांची उधळण करणारा आणि नात्यांची नव्याने गुंफण करणारा सण हा दिवाळी  (Diwali) हा सण आहे. दिवाळीमधील महत्त्वाचा सण म्हणजे बलिप्रतिपदा (Balipratipada) म्हणजेच दिवाळी पाडवा. (diwali padva) आज सर्वत्र हा सण साजरा केला जाणार आहे. याच दिवशी पत्नी पतीला ओवाळणी करते. तर दुसरीकडे याच दिवशी बळीराजा आपल्या शेतात राबणाऱ्या जनावरांची मनोभावे सेवा करतो. तसंच बळीराजाचं राज्य येवो अशीही प्रार्थना शेतकरी राजा करतो.

     या दिवशी मोठ्या जल्लोषात दिवाळी साजरी केली जाते. सध्या ऑनलाईनच्या युगात आपण दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा देऊ शकतो.

     दरवर्षी या दिवशी मोठा जल्लोष असतो. तसंच आता आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा नातेवाईकांना आणि मित्र परिवाराला शुभेच्छा देऊ शकता. त्यामुळे आम्ही आपल्यासाठी काही खास मेसेज आम्ही घेऊन आलो आहोत आपण हे खास ग्रीटिंग्ज संदेश (Balipratipada diwali padva wishes and Quotes) वापरू शकता. तसेच व्हॉट्सअ‍ॅपवर (Whatsapp) आणि सोशल मीडियावर हे शुभेच्छांचे मेसेज शेअर करु शकतात.

         द्या बलिप्रतिपदेच्या विशेष शुभेच्छा--

=========================================
जगाचा पोषणकर्ता माझ्या बळीराजाला सुखाचे दिवस येवोत या सदिच्छेसह बलिप्रतिपदेच्या आपणास हार्दिक शुभेच्छा !
बलिप्रतिपदेच्या (दिवाळी पाडवा) मन:पूर्वक शुभेच्छा...!

पाडवा अर्थात बलिप्रतिपदा
पाडवा आगमनाने आपल्या आयुष्यात सदैव
गोडवा यावा... आशीर्वाद आपल्याला मिळत राहो
बलिप्रतिपदेच्या (दिवाळी पाडवा) मन:पूर्वक शुभेच्छा...!

दिवाळी पाडवा अर्थात 'बलिप्रतिपदा' हा दिवाळी सण आपणा सर्वांना  समृद्धी आणि भरभराटीचे जावो.
बलिप्रतिपदेच्या (दिवाळी पाडवा) मन:पूर्वक शुभेच्छा...!

बळीराजाच्या जीवनात सुख-समृद्धी येवो. सर्वांना बलिप्रतिपदेच्या हार्दिक शुभेच्छा!
बलिप्रतिपदेच्या (दिवाळी पाडवा) मन:पूर्वक शुभेच्छा...!

गोवर्धन धराधार गोकुलत्राणकारक
विष्णुबाहुकृतोच्छ्राय गवां कोटिप्रदो भव
बलिप्रतिपदेच्या (दिवाळी पाडवा) मन:पूर्वक शुभेच्छा...!

ईडा पीडा टळो, बळीचं राज्य येवो
सर्वांना बलिप्रतिपदा, दिपावली पाडव्याच्या खूप-खूप शुभेच्छा
बलिप्रतिपदेच्या (दिवाळी पाडवा) मन:पूर्वक शुभेच्छा...!

साडे तीन शुभमुहूर्तापैकी एक बलिप्रतिपदा म्हणजे दिवाळी पाडवा. याच दिवसाच्या आपल्याला हार्दिक शुभेच्छा
बलिप्रतिपदेच्या (दिवाळी पाडवा) मन:पूर्वक शुभेच्छा...!
=========================================

                   (साभार आणि सौजन्य-संदर्भ-टाईम्स नाऊ मराठी.कॉम)
                  ------------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-14.11.2023-मंगळवार.
=========================================

CHECK OUT MY SOCIALS -

INSTAGRAM - https://instagram.com/atul_chya_kavita
PINTEREST - https://www.pinterest.com/chyakavitaatul55/
TWITTER(X)- https://twitter.com/AtulChyaKavita
YOUTUBE   - https://www.youtube.com/@atulchyakavita4928/videos
FACEBOOK  - https://www.facebook.com/atulchyakavita
=========================================