दिवाळी पाडवा-शुभेच्छा

Started by Atul Kaviraje, November 14, 2023, 08:02:15 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                     "दिवाळी पाडवा"
                                    ----------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१४.११.२०२३-मंगळवार आहे. आज "दिवाळी पाडवा" आहे. पौराणिक महत्त्व असलेला आणि कृषिप्रधान संस्कृतीचं प्रतिबिंब दाखवणारा कार्तिक महिन्याचा हा आरंभदिन अतिशय महत्त्वाचा मानला गेला आहे. पूर्वापार हा दिवस नव्या सुरुवातीचाच मानला जातो. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण, कवी-कवियत्रींना दिवाळी पाडवा आणि दिवाळी सणाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया, दिवाळी पाडवा शुभेच्छा.

          दिवाळी पाडवा शुभेच्छा--

=========================================
आज बलिप्रतिपदा!
दिवाळी पाडवा,
राहो सदा नात्यात गोडवा..
कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजे,
बलिप्रतिपदा (दिवाळी पाडवा).
साडेतीन मुहूर्तांपैकी एक..
बलिप्रतिपदेच्या तुम्हाला व तुमच्या
परिवारास मनापासून शुभेच्छा..
🙏शुभ दीपावली!🙏

ईडा पीडा टळो, बळीचं राज्य येवो..
सर्वांना बलिप्रतिपदा,
🧨दिपावली पाडव्याच्या खूप-खूप शुभेच्छा!🧨

आज पाडवा अर्थात बलिप्रतिपदा!
पाडवा आगमनाने आपल्या आयुष्यात
सदैव गोडवा ❤️ यावा!
सत्याचा असत्यावरचा विजय नेहमीच नव्याने प्रेरणा देत राहो!
थोरा मोठ्यांचे आशीर्वाद ✨ आपल्याला मिळत राहो!
🙏आपणांस व आपल्या कुटुंबियांना पाडवा अर्थात बलिप्रतिपदाच्या शुभेच्छा!🙏

आला पाडवा, चला सजवूया
रांगोळ्याच्या आराशी,
इच्छित लाभो मनी असे ते,
सुखही नांदो पावलाशी
🙏दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा!🙏

सुमुहूर्तावरी पाडव्याच्या..
एकात्मतेचे लेणं ❤️ लेऊया..
भिन्न-विभिन्न असलो तरी..
मनाने एक होऊया..
🙏पाडवा व बलिप्रतिपदेच्या हार्दिक शुभेच्छा..🙏

प्रेमाचे दीप जळो,
प्रेमाच्या फुलबाज्या उडो,
प्रेमाची उमलावी फुले,
प्रेमाच्या पाकळ्या,
प्रेमाची बासरी,
प्रेमाच्या सनया-चौघडे,
आनंदाचे दीप जळो,
दुःखाची सावलीही न पडो.
🙏दिवाळी पाडव्याच्या खूप शुभेच्छा!🙏

तेजोमय झाला आजचा प्रकाश,
जुना कालचा काळोख,
सारे रोजचे तरीही भासे नवा सहवास,
सोन्यासारख्या
🙏नात्यासाठी हा पाडवा खास,
पाडव्याच्या प्रेमपूर्वक शुभेच्छा!🙏
=========================================

                     (साभार आणि सौजन्य-संदर्भ-हिंदी मराठी sms.कॉम)
                    -----------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-14.11.2023-मंगळवार.
=========================================

CHECK OUT MY SOCIALS -

INSTAGRAM - https://instagram.com/atul_chya_kavita
PINTEREST - https://www.pinterest.com/chyakavitaatul55/
TWITTER(X)- https://twitter.com/AtulChyaKavita
YOUTUBE   - https://www.youtube.com/@atulchyakavita4928/videos
FACEBOOK  - https://www.facebook.com/atulchyakavita
=========================================