भाऊबीज-माहिती

Started by Atul Kaviraje, November 15, 2023, 09:00:31 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                        "भाऊबीज"
                                       -----------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१५.११.२०२३-बुधवार आहे. आज "भाऊबीज" आहे. भाऊबीज म्हणजेच यम द्वितीया हा सण बुधवार १५ नोव्हेंबर रोजी साजरा होणार आहे. हा सण भाऊ आणि बहिणीच्या पवित्र नात्याला समर्पित आहे. या दिवशी कपाळावर टिळा लावून आरती करून बहिणी आपल्या भावाच्या दीर्घायुष्याची कामना करतात. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण, कवी-कवियत्रींना भाऊबीज  आणि दिवाळी सणाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया  भाऊबीजे वर महत्त्वाची माहिती.

     Bhaubeej 2023 marahi festival म्हणजेच सगळ्या बहिणींचा आवडता सण भाऊबीज. वर्षभर ज्या सणाची भाऊ आणि बहीण आतुरतेने वाट बघतात तो सण म्हणजेच भाऊबीज .

     दिवाळीतील शेवटचा आणि ५ वा दिवस हा भाऊबीजेचा असतो . चार दिवसाची दिवाळी सम्पल्यानंरतर हा भाऊबीजेचा दिवस येतो. ह्या दिवसाबद्दल आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत कि ह्या वर्षी हा सण कोणत्या तारखेला , कोणत्या रोजी येतोय . शुभ मुहूर्त किती वाजता आहे.

     वसुबारस , धनतेरस , लक्ष्मी पूजन आणि दीपावली पाडवा संपल्यानंतर भाऊबीज येते . ह्या वर्षा मध्ये म्हणजेच 2023 भाऊबीज हा सण कार्तिक शुक्ल २. तारीख 15 नोव्हेंबर 2023 , वार बुधवार रोजी आहे . तसेच भावाला औक्षण करण्याचा शुभ मुहूर्त हा दुपारी १ वाजून १० मिनिटांनी सुरु होणार असून तो दुपारी ३ वाजून २१ मिनिटांनि संपणार आहे . ह्या २ तास 32 मिनिटाच्या शुभ मुहूर्तावर भावाला ओवाळायचे आहे आणि ( bhaubeej 2023) , भाऊबीज साजरी करायची आहे .

     आता आपण बघितले औक्षण करण्याची वेळ , वार तारीख आता आपण जाणून घेऊयात कि bhaubij सण का साजरी करतात . आणि ह्या मागे काय दंत कथा आहेत ह्या बद्दल थोडे जाणून घेऊयात .

     भाऊबीज का साजरी केली जाते ?. आणि त्या मागील कथा- यम आपल्या सगळ्यांना माहित आहेत . ह्याच यमराजाची एक गोष्ट हि भाऊबिजे ची आहे ती कथा आपण बघुयात.

     यमराजाला एक बहीण होती तिचे नाव यमुना होते. तिला यमराज हे प्रेमाने यमे असे म्हणायचे . एके दिवशी ह्या युमुनाने यमराजला सांगितले कि तू माझ्या घरी ये तू माझ्या घरी कधीच येत नाही . त्यामुळे तू मला वचन दे कि तू माझ्या घरी नक्की येशील .

     त्यावर यम हा चिंतेत पडला . आणि विचार करू लागला कि मी ज्याच्या घरी जातो त्या घरातील एकाचे प्राण घेऊन येतो. परंतु जर मी यमे च्या घरी गेलो तर तिच्या घरातील एकाचे तरी प्राण मला घ्यावे लागतील . आणि म्हणून मी एवढ्या दिवसा पासून तुझ्या घरी येत नहोतो . पण आता तू मला वचन मागितले. आणि मी हे वचन तुला देतो कि मी नक्की तुझ्या घरी येईल .

     यमराज म्हणाले आता मी तुला वचन दिलेय म्हटल्यावर मला यावंच लागेल . तू काळजी नको करुस तू सांगितलेल्या दिवशी मी तुझ्या घरी येतो . त्या नंतर ठरल्या प्रमाणे शेवटी तो दिवस उजाडला . आणि यमराज यमुनेच्या घरी जायला निघाला .

     यमुनाने पण भाऊ यम येणार आहे म्हणून पूर्ण घर छान सजवले , दारा बाहेर रांगोळी काढली , दिवे लावले छान रोषणाई केली . तेवढ्यात यमराज हे तिच्या घरी आले आणि त्यांनी यमुनाने केलेली तयारी बघितली . आणि त्यांना सजवलेले घर, दिवे , हे सगळे बघून त्यांचे पण प्रसन्न झाले . आणि ते आनंदी झाले .

     त्यानंतर यमुनाने त्यांचा पाहुणचार केला , आणि औक्षण केले. आणि यमराजाने तिच्या ताटात भेट वस्तू दिली . आणि विचारले माग तुला काय आशीर्वाद हवाय.

     त्यावर यमुना म्हणाली ह्या दिवशी जी बहीण भावाला ओवळेल त्या भावाला तू अपमृत्यू पासून वाचवशील . त्या भावाचे रक्षण करशील त्याच बरोबर तिच्या घरावरील संकट दूर करशील असा आशीर्वाद यमे ने मागितला आणि तो यमराजाने तिला दिला . आणि यमराजाने स्वतः आशीर्वाद दिल्यामुळे त्यांना तिच्या घरातील एका हि माणसाचे प्राण ही घेता आले नाही .

     म्हणून त्या दिवसापासून भाऊबीज सण साजरी करण्याची प्रथा सुरु झाली आणि तो दिवस होता कार्तिक शु २ चा यम द्वितीयेचा . म्हणून हा दिवस भाऊबीज म्हणून साजरी केला जातो .

     ह्या दिवशी प्रत्येक बहीण आपल्या भावाला ओवाळते आणि भावाच्या दीर्घ आयुष्य लाभो यासाठी मनापासून प्रार्थना करते . त्याचे आरोग्य चांगले राहो तो आनंदी राहो अशी प्रार्थना देवाकडे करते . अश्या ह्या लाडक्या बहीण भावाच्या नात्याचा सण म्हणजेच भाऊबीज. आणि ह्या bhaubeej 2023 च्या तुम्हाला सर्वांना शुभेच्छा !

--poonam m.
---------------

                     (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी फेस्टिवल.कॉम)
                    ----------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-15.11.2023-बुधवार.
=========================================

CHECK OUT MY SOCIALS -

INSTAGRAM - https://instagram.com/atul_chya_kavita
PINTEREST - https://www.pinterest.com/chyakavitaatul55/
TWITTER(X)- https://twitter.com/AtulChyaKavita
YOUTUBE   - https://www.youtube.com/@atulchyakavita4928/videos
FACEBOOK  - https://www.facebook.com/atulchyakavita
=========================================