भाऊबीज-हार्दिक शुभेच्छा-1

Started by Atul Kaviraje, November 15, 2023, 09:05:23 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                       "भाऊबीज"
                                      -----------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१५.११.२०२३-बुधवार आहे. आज "भाऊबीज" आहे. भाऊबीज म्हणजेच यम द्वितीया हा सण बुधवार १५ नोव्हेंबर रोजी साजरा होणार आहे. हा सण भाऊ आणि बहिणीच्या पवित्र नात्याला समर्पित आहे. या दिवशी कपाळावर टिळा लावून आरती करून बहिणी आपल्या भावाच्या दीर्घायुष्याची कामना करतात. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण, कवी-कवियत्रींना भाऊबीज  आणि दिवाळी सणाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया  भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा.

     भाऊबीज हा बहीण आणि भाऊ यांच्यातीळ अतूट नात्यासाठी समर्पित हिंदु उत्सवांपैकी एक आहे. या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. या वर्षी भाऊभीज सोमवार 26 ऑक्टोबर या दिवशी साजरा केला जाणार आहे. हा सॅन देखील रक्षा बंधन प्रमाणेच साजरा केला जातो.

     मित्रानो या लेखाच्या द्वारे आम्ही तुमच्या साठी Bhaubeej messages in Marathi घेऊन आलो आहोत, हे Bhaubeej sms in Marathi तुम्ही तुमच्या भावासोबत किव्हा तुमच्या बहिणीसोबत शेअर करून आजचा हा अजून स्पेशल करू शकता.

        भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा--

=========================================
रक्षणाचे वचन, प्रेमाचे बंधन, घेऊन आला हा सण,
लाख लाख शुभेच्छा तुला आज आहे
बहीण भावाचा पवित्र सण...
भाऊबीज च्या हार्दिक शुभेच्छा!

बहिणीची असते भावावर अतूट माया,
मिळो त्याला नेहमी अशीच प्रेमाची छाया,
भावाची असते बहिणीला साथ,
मदतीला देतो नेहमीच हात...
ताई दादाच्या पवित्र प्रेमाचा सण,
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!

ओवाळल्यानंतर आज विचारलं बहिणीला,
"सांग ना तायडे.. तुला भेट काय देऊ?
म्हणाली: "एकच मागते आयुष्यात भावड्या,
आई-बाबांना वृद्धाश्रमात कधी नको ठेऊ...!!!"
आणि भावाने बहिणीला दिलेले सुंदर उत्तर:
पण ताई तुही लक्षात ठेव,
कोणत्याही मुलाला त्याच्या आई
वडीलांपासुन वेगळे करू नकोस...

शुभ सकाळ!
जिव्हाळ्याचे संबंध दिवसागणिक
उजळत राहू दे!
भावा-बहिणीची साथ
आयुष्यभर अतूट राहु दे...
भाऊबीजेच्या शुभेच्छा! 👫

कधी नकोय काही तुझ्याकडून,
फक्त तुझी साथ हवीय..
तुझी साथ ही दिवाळीच्या
मिठाई पेक्षा गोड आहे...
दिवाळीच्या प्रेमळ शुभेच्छा!

पहिला दिवा आज लागला दारी
सुखाची किरणे येई घरी
पूर्ण होवो तुमच्या सर्व इच्छा
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा

दीपावलीचा आरंभ होतो
पणत्यांच्या साक्षीने
जवळीकतेचा आरंभ होतो
दिव्या दिव्याच्या ज्योतीने
भाऊबीज आणि दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
=========================================

--by Rohit Mhatre
--------------------

                      (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी वारसI.कॉम)
                     --------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-15.11.2023-बुधवार.
=========================================

CHECK OUT MY SOCIALS -

INSTAGRAM - https://instagram.com/atul_chya_kavita
PINTEREST - https://www.pinterest.com/chyakavitaatul55/
TWITTER(X)- https://twitter.com/AtulChyaKavita
YOUTUBE   - https://www.youtube.com/@atulchyakavita4928/videos
FACEBOOK  - https://www.facebook.com/atulchyakavita
=========================================