मंगल-अष्टका

Started by बाळासाहेब तानवडे, November 13, 2010, 08:57:08 PM

Previous topic - Next topic

बाळासाहेब तानवडे

मंगल-अष्टका

सावधान सावधान शुभमंगल सावधान
बाल्य फुलले आनंदाने.
तारुण्य  सजले सुख स्वप्नाने.
राज स्वप्नांच्या पुर्ततेने.
बाल जीवनी आले समाधान.
सावधान सावधान शुभमंगल सावधान.

राजस ,तेजस मुख कमलानी.
भाग्य उजळले पाय गुणांनी.
शोभे सौंदर्यवती रानी,
जसी रघु राजाची ती छान.
सावधान सावधान शुभमंगल सावधान

जोड़ा अनुरूप या दोघांचा.
संसार होई स्वर्ग सुखाचा.
जीवनाच्या खेळी भाग्याच,
पडे अनुकूल हे दान.
सावधान सावधान शुभमंगल सावधान,

दोन्ही घरच्या थोर जनांचा.
आशीर्वाद लाभो नित्य तयांचा.
"नांदा सौख्यभरे" बोलूनी.
उधळती अक्षता त्या महान.
सावधान सावधान शुभमंगल सावधान.

कवी : बाळासाहेब तानवडे


amoul

khupach chhan

सावधान सावधान

mast!!

बाळासाहेब तानवडे

Amoul,  अभिप्रायाबद्दल अत्यंत आभारी आहे.

pradip shigvan

'शुभ मंगल' बोलल्यानंतर 'सावधान' का म्हटले जाते.

vijaya kelkar

छान ,
मंगल-अष्टका ....म्हणजे मंगलकारी आठ कडवी वा ओळी असे काही असावे असे वाटले होते .