१६-नोव्हेंबर-दिनविशेष

Started by Atul Kaviraje, November 16, 2023, 10:22:59 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१६.११.२०२३-गुरुवार. जाणून घेऊया,आजच्या दिवसाचे "दिन-विशेष"

                                 "१६-नोव्हेंबर-दिनविशेष"
                                ----------------------

-: दिनविशेष :-
१६ नोव्हेंबर
राष्ट्रीय पत्रकारिता दिन
International Day for Tolerance
=========================================
अ) महत्त्वाच्या घटना:
   ----------------
२०१३
२४ वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीनंतर महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याची क्रिकेटमधून निवृती व त्यानंतर काही तासातच त्यास 'भारतरत्‍न' हा भारतातील सर्वोच्‍च नागरी किताब जाहीर झाला. त्याला हा सन्मान सर्वात लहान वयात (४०) मिळाला.
२०००
कवीकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठातर्फे दिला जाणारा 'संस्कृत रचना पुरस्कार' डॉ. गजानन बाळकृष्ण पळसुले यांना जाहीर.
१९९७
अनिवासी भारतीय उद्योजक स्वराज पॉल यांना ब्रिटनमधील ब्रॅडफोर्ड विद्यापीठाकडून सन्माननीय डॉक्टरेट प्रदान
१९९६
कोकण रेल्वेच्या रत्‍नागिरी - मुंबई मार्गाचा शुभारंभ
१९९६
'चतुरंग प्रतिष्ठान'च्या 'पर्सन ऑफ प्राईड' पुरस्कारासाठी मुख्य निवडणुक आयुक्त टी. एन. शेषन यांची निवड
१९८८
अकरा वर्षांनंतर झालेल्या सार्वत्रिक निवडणुका जिंकुन बेनझीर भुट्टो पाकिस्तानच्या पंतप्रधान बनल्या.
१९४५
युनेस्को (UNESCO) ची स्थापना झाली.
१९३०
स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी रत्‍नागिरीत स्पृश्यास्पृश्यांचे पहिले प्रकट सहभोजन केले.
१९१५
लाहोर कटातील आरोपी विष्णू गणेश पिंगळे, बागी कर्तार सिंग यांच्यासह ७ जणांना फाशी देण्यात आली.
१९१४
अमेरिकेतील मध्यवर्ती बँक 'फेडरल रिझर्व्ह' सुरू झाली.
१९०७
ओक्लाहोमा हे अमेरिकेचे ४६ वे राज्य बनले.
१८९३
डॉ. अ‍ॅनी बेझंट यांचे भारतात आगमन
१८६८
लॅकियर आणि नान्सेन या शास्त्रज्ञांनी खग्रास सूर्यग्रहणाचा अभ्यास करून हेलियमचा शोध लावला. ग्रीक सूर्यदेवता 'हेलिऑस' वरुन त्या वायूला हे नाव देण्यात आले आहे.
=========================================
ब) जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  ------------------------------
१९७३
पुल्लेला गोपीचंद – बॅडमिंटनपटू
१९६३
मीनाक्षी शेषाद्री – अभिनेत्री
१९३०
मिहिर सेन – इंग्लिश खाडी पोहुन जाणारे पहिले भारतीय
(मृत्यू: ११ जून १९९७)
१९२८
डॉ. निर्मलकुमार फडकुले – मराठी संत साहित्यातील विद्वान (मृत्यू: २९ जुलै २००६)
१९२७
डॉ. श्रीराम लागू – 'नटसम्राट', 'हिमालयाची सावली', 'किरवंत', 'क्षितीजापासून समुद्र' इ. अनेक नाटकांतील प्रभावी चरित्र भूमिकांनी दोन दशके रंगभूमी गाजवणारे कलावंत, मराठी व हिन्दी चित्रपटांतील कलाकार
(मृत्यू: १७ डिसेंबर २०१९)
१९१७
चित्रगुप्त श्रीवास्तव ऊर्फ 'चित्रगुप्त' – संगीतकार
(मृत्यू:१४ जानेवारी १९९१)
१८९४
काव्यविहारी' धोंडो वासुदेव गद्रे – केशवसुत संप्रदायी आधुनिक कवी
(मृत्यू: २२ जानेवारी १९७५)
१८३६
डेविड कालाकौआ – हवाईचा राजा
(मृत्यू: २० जानेवारी १८९१)
=========================================
क) मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
    -------------------------
२००६
मिल्टन फ्रीडमन – नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ
(जन्म: ३१ जुलै १९१२)
१९६७
रोशनलाल नागरथ ऊर्फ 'रोशन' – संगीतकार
(जन्म: १४ जुलै १९१७)
१९६०
क्लार्क गेबल – अमेरिकन अभिनेता (१ फेब्रुवारी १९०१)
१९५०
डॉ. बॉब स्मिथ – 'अल्कोहोलिक्स अ‍ॅनॉनिमस'चे एक संस्थापक
(जन्म: ८ ऑगस्ट १८७९)
१९१५
गदर पार्टीचे सदस्य आणि लाहोर कटातील क्रांतिकारक विष्णू गणेश पिंगळे यांच्यासह ७ जणांना फाशी देण्यात आले.
(जन्म: ? ? १८८८ - तळेगाव ढमढेरे, पुणे)
=========================================

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-16.11.2023-गुरुवार.
=========================================

CHECK OUT MY SOCIALS -

INSTAGRAM - https://instagram.com/atul_chya_kavita
PINTEREST - https://www.pinterest.com/chyakavitaatul55/
TWITTER(X)- https://twitter.com/AtulChyaKavita
YOUTUBE   - https://www.youtube.com/@atulchyakavita4928/videos
FACEBOOK  - https://www.facebook.com/atulchyakavita
=========================================