प्रार्थना

Started by बाळासाहेब तानवडे, November 13, 2010, 09:00:26 PM

Previous topic - Next topic

बाळासाहेब तानवडे

प्रार्थना

नमीतो तुज, प्रार्थतो तुज ,तुच आहे दाता अमूचा,
तुज वाचून व्यर्थ आहे ,संसार हा जरी सुखाचा,

नामात तुझ्या सदा असावे, चित्तात रूप तुझे वसावे.
नयानांच्या ज्योतिना आमच्या , तुज पाहण्या तेज गवसावे.

कधी होशी तू राधेचा  शाम ,कधी बनसी तू जानकीचा राम.
साथ राहो सदा तुझी , जरी असु आम्ही भाबडे अन आम.

हातांना आराम नसावा ,मनात सद्विचारांचा राहो ठेवा.
अथक प्रयत्नांती द्यावा , गोड यशाचाच मेवा.

जीवनाचा ध्यास, तुच विसावा , जगण्याची आस तुच दिसावा.
जागो जागी, क्षणो क्षणी  तुझाच नेहमी वास असावा.

कवी : बाळासाहेब तानवडे