दिन-विशेष-लेख-आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिन

Started by Atul Kaviraje, November 17, 2023, 09:14:40 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                   "दिन-विशेष-लेख"
                               "आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिन"
                              ------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-17.11.2023-शुक्रवार आहे. १७-नोव्हेंबर, हा दिवस "आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिन" म्हणूनही ओळखला जातो. वाचूया, तर या दिवसाचे महत्त्व, आजच्या या "दिन-विशेष-लेख" या शीर्षकI-अंतर्गत.

             आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिन--

     ती भयानक घटना १७ नोव्हेंबर १९३९ ला घडली. जान ओप्लेताल या विद्यार्थ्याच्या मृत्यूच्या आणि झेकोस्लोव्हाकियावर नाझींनी केलेल्या आक्रमणाच्या निषेधार्थ आंदोलन पुकारणाऱ्या विद्यार्थ्यांनी निदर्शने निर्दयपणे चिरडून टाकत नाझी सैन्याने नऊ जणांना विनाचौकशी देहदंड ठोठावला आणि १२०० जणांची कॉन्स्न्ट्रेशन कॅम्पमध्ये रवानगी केली. तो १७ नोव्हेंबरचा दिवस होता.

     जोसेफ तुस्कानोती भयानक घटना १७ नोव्हेंबर १९३९ ला घडली. जान ओप्लेताल या विद्यार्थ्याच्या मृत्यूच्या आणि झेकोस्लोव्हाकियावर नाझींनी केलेल्या आक्रमणाच्या निषेधार्थ आंदोलन पुकारणाऱ्या विद्यार्थ्यांनी निदर्शने निर्दयपणे चिरडून टाकत नाझी सैन्याने नऊ जणांना विनाचौकशी देहदंड ठोठावला आणि १२०० जणांची कॉन्स्न्ट्रेशन कॅम्पमध्ये रवानगी केली. तो १७ नोव्हेंबरचा दिवस होता. त्या हुतात्म्यांची आठवण म्हणून हा दिवस जगभर पाळला जातो.पहिला आंतरराष्ट्रीय विद्याथीर् दिन १९४१ साली इंटरनॅशनल स्टुडंट कौन्सिलने लंडनमध्ये साजरा केला. पुढे इंटरनॅशनल युनियन ऑफ स्टुडंट्स आणि युरोपीयन नॅशनल युनियन ऑफ स्टुडंट्स या संघटनांनीदेखील ही प्रथा अंगिकारली. ग्रीसमधील अथेन्स पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी १९७३ साली तिथल्या लष्करी राजवटीविरोधात पुकारलेले बंड, १९८९च्या सुवर्णमहोत्सवी वषीर् सोशालिस्ट युनियन ऑफ यूथ या संघटनेतफेर् कम्युनिस्ट झेक सरकारविरुद्ध छेडलेले आंदोलन या विद्याथीर् दिनाच्या ठळक घटना होत. झेकमधील स्वराज्य आणि प्रजासत्ताकाच्या हक्कांसाठीची गाजलेली वेल्वेट क्रांती याच दिवशी झाली होती.

     बलिर्नशी भिंत कोसळल्यानंतर देखील इंटरनॅशनल युनियन ऑफ स्टुडंटतफेर् या दिवशी जल्लोश झाला होता. २००४च्या नोव्हेंबरला मुंबईत भरलेल्या र्वल्ड सोशल फोरमच्या परिषदेत पुन्हा एकदा जगभरातील विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन विद्यार्थ्यांच्या हक्कांचा उद्घोष केला होता.देशाच्या धामिर्क, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक परिस्थितीत बदल घडवून आणण्याची ताकद विद्यार्थ्यांमध्ये असते. ही त्यांची क्षमता ओळखूनच युरोपीयन युनियन विश्व विद्याथीर् दिनाच्या सोहळ्यात सहभागी होत असते. इथल्या विद्यार्थ्यांनी कोलम्बिया, इराण, झिम्बाब्वे यासारख्या देशांत होणाऱ्या दडपशाहीविरुद्ध आवाज उठवला आहे. 'शिक्षण ही मुठभरांचीच मक्तेदारी नको, शिक्षण सर्वांसाठी' हा त्यांचा आग्रह आहे. समाज घडवण्यात तरुण विद्याथीर् नेहमीच आघाडीवर असतात, त्यांचा उच्चरवातील आवाज राज्यर्कत्यांना असह्य होतो आणि त अखेर नमते घेतात. हे देशोदेशी आढळून आलंय. अर्थात या झाल्या संघर्षाच्या कहाण्या. पण आजच्या तथाकथित शांततेच्या काळात विद्यार्थ्यांचे काय हाल होताहेत, त्यांचा आवाज, त्यांची मते सर्रासपणे धुडकावली जात आहेत. मात्र विद्याथीर् आंदोलनाकडे राज्यर्कत्यांनी दुर्लक्ष करून चालणार नाही.

--महाराष्ट्र टाइम्स.कॉम
--------------------

                      (साभार आणि सौजन्य-संदर्भ-महाराष्ट्र टाईम्स.कॉम)
                     ---------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-17.11.2023-शुक्रवार.
=========================================

CHECK OUT MY SOCIALS -

INSTAGRAM - https://instagram.com/atul_chya_kavita
PINTEREST - https://www.pinterest.com/chyakavitaatul55/
TWITTER(X)- https://twitter.com/AtulChyaKavita
YOUTUBE   - https://www.youtube.com/@atulchyakavita4928/videos
FACEBOOK  - https://www.facebook.com/atulchyakavita
=========================================