दिन-विशेष-लेख-हिंदू-हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे पुण्यतिथी-A

Started by Atul Kaviraje, November 17, 2023, 09:20:43 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                  "दिन-विशेष-लेख"
                   "हिंदू-हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे पुण्यतिथी"
                  ------------------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-17.11.2023-शुक्रवार आहे. १७-नोव्हेंबर, हा दिवस "हिंदू-हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे पुण्यतिथी" म्हणूनही ओळखला जातो. वाचूया, तर या दिवसाचे महत्त्व, आजच्या या "दिन-विशेष-लेख" या शीर्षकI-अंतर्गत.

     बाळ केशव ठाकरे (Bal Keshav Thackeray) यांनी महाराष्ट्रात भूमिपुत्रांना न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेना पक्षाची स्थापना केली. व्यंगचित्रकार ते पक्षप्रमुख असा प्रवास करणार्‍या बाळ ठाकरेंना कोणतीही सक्रिय राजकारणाची पार्श्वभूमी नव्हती. वडीलांकडून प्रेरणा घेऊन त्यांनी महाराष्ट्रभर आपला करिष्मा तयार केला. यंदा त्यांची दहावी पुण्यतिथी आहे. 17 नोव्हेंबर 2012 दिवशी वृद्धापकाळाने त्यांनी राहत्या घरीच अखेरचा श्वास घेतला होता.

           बाळासाहेब ठाकरे यांची माहिती--

     बाळ केशव ठाकरे! एक भारतीय  राजकारणी! बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापना केली.

     मराठीला ते जास्त प्राधान्य द्यायचे. त्यांचा पक्ष पश्चिम महाराष्ट्रात सक्रिय स्वरूपात कार्य करीत आहे. त्यांचे सहकारी त्यांना ''बाळासाहेब'' या नावाने हाक मारीत तर त्यांना मानणारे त्यांना हिंदु हृदय  सम्राट म्हणतात.

     बाळासाहेबांचा जन्म पुण्यात २३ जानेवारी १९२६ ला रमाबाई आणि केशव सीताराम ठाकरे (प्रबोधनकार ठाकरे या नावाने देखील सुपरीचीत आहेत) या दाम्पत्याच्या पोटी झाला. आपल्या नऊ भावंडामध्ये ते सर्वात मोठे होते. केशव ठाकरे एक सामाजिक कार्यकर्ता होते. १९५० साली झालेल्या संयुक्त महाराष्ट्र अभियानात देखील ते सहभागी होते व भारताची राजधानी मुंबई व्हावी याकरता ते सतत प्रयत्नशील राहीले.

     बाळासाहेबांचे वडिल आपल्या अभियानाला यशस्वी करण्याकरीता सामाजिक हिंसेला महत्व देत असत, परंतु ज्यासुमारास त्यांच्यावर पक्षपाताचा आरोप होऊ लागला त्यावेळी त्यांनी आपले अभियान मागे घेतले. बाळासाहेबांनी मीनाताई ठाकरेंशी विवाह केला. त्यांना तीन मुलं झालीत बिंदुमाधव ठाकरे, जयदेव ठाकरे आणि उध्दव ठाकरे.

=========================================
मराठी राजनेता बाळासाहेब ठाकरे यांचा अल्पपरिचय –

नाव:-बाळ केशव ठाकरे
जन्म:-२३ जानेवारी १९२६
जन्मस्थान:-पुणे महाराष्ट्र
वडिल:-केशव सिताराम ठाकरे
आई:-रमाबाई केशव ठाकरे
विवाह:-मीना ठाकरे
=========================================

           बाळासाहेब ठाकरेंची प्रारंभीची कारकिर्द –

     बाळासाहेब ठाकरेंनी आपली कारकिर्द फ्री प्रेस जर्नल, मुंबईत इंग्रजी भाषेतील व्यंगचित्रकार म्हणुन (कार्टुनिस्ट) म्हणुन सुरू केली. त्यांची ही व्यंगचित्र टाईम्स ऑफ इंडियाच्या रविवार च्या अंकात छापली जात असत. १९६० ला त्यांनी हे काम सोडले आणि स्वतःचे एक ''मार्मिक'' नावाचे वृत्तपत्र सुरू केले.

मार्मिक च्या माध्यमातुन बाळासाहेब गैरमराठी लोकांच्या मुंबईतील आणि एकंदरीतच महाराष्ट्रातील वाढत्या लोकसंख्येच्या विरोधात भाष्य करीत असत.

बाळासाहेब ज्या सुमारास फ्री प्रेस जर्नल मधुन वेगळे झाले त्यावेळी त्यांच्यासमवेत आणखीन ३ ते ४ लोकं होते त्यातल्याच जॉर्ज फर्नांडिस यांनी देखील स्वतःचे वृत्तपत्र सुरू केले. ते १ ते २ महिने चालले.

बाळासाहेबांच्या राजनैतिक सिध्दांतांमधे त्यांच्या वडिलांचा फार मोठा हात होता. ते संयुक्त महाराष्ट्र अभियानाचे प्रमुख होते. महाराष्ट्राच्या विभाजनाचा त्यांनी प्रखर विरोध केला होता.

मार्मिक च्या माध्यमातुन ते आपल्या अभियाना अंतर्गत मुंबईत वाढत चाललेल्या गैर मराठी लोकांच्या लोकसंख्येवर टिका करीत असत.

१९६६ साली बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना पक्षाची स्थापना केली जेणेकरून महाराष्ट्रात आणि विशेषतः मुंबईत मराठी लोकांची संख्या वाढवावी आणि मराठी लोकांना राजकारणात आणता यावे.

१९६० च्या अखेरीस आणि १९७० च्या सुरूवातीला ठाकरेंनी आपल्या अल्प सहकार्यांसमवेत संपुर्ण महाराष्ट्रात आपल्या पक्षाची स्थापना केली.

पक्षाची स्थापना करताच त्यांनी मराठी वृत्तपत्र सामना आणि हिंदी वृत्तपत्र दोपहर का सामना सुरू केले. आपल्या आयुष्यात त्यांनी अनेक अभियान राबविले आणि सदैव मराठी लोकांच्या हक्काकरीता लढत राहीले.

--Majhi Marathi
------------------

                       (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मIझी मराठी.कॉम)
                      -------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-17.11.2023-शुक्रवार.
=========================================

CHECK OUT MY SOCIALS -

INSTAGRAM - https://instagram.com/atul_chya_kavita
PINTEREST - https://www.pinterest.com/chyakavitaatul55/
TWITTER(X)- https://twitter.com/AtulChyaKavita
YOUTUBE   - https://www.youtube.com/@atulchyakavita4928/videos
FACEBOOK  - https://www.facebook.com/atulchyakavita
=========================================