दिन-विशेष-लेख-हिंदू-हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे पुण्यतिथी-B

Started by Atul Kaviraje, November 17, 2023, 09:22:46 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje


                                    "दिन-विशेष-लेख"
                     "हिंदू-हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे पुण्यतिथी"
                    ------------------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-17.11.2023-शुक्रवार आहे.  १७-नोव्हेंबर, हा दिवस "हिंदू-हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे पुण्यतिथी" म्हणूनही ओळखला जातो. वाचूया, तर या दिवसाचे महत्त्व, आजच्या या "दिन-विशेष-लेख" या शीर्षकI-अंतर्गत.

          राजकारण-

१९ जुन १९६६ साली महाराष्ट्रातील लोकांच्या हक्काकरीता बाळासाहेबांनी शिवसेना पक्षाची स्थापना केली.

पुढे १९७० मधे मराठी साहित्याचे इतिहासकार बाबासाहेब पुरंदरे आणि महाराष्ट्र ट्रेड युनियन चे मुख्य अधिकारी माधव मेहरे यांचा पक्षात समावेश झाल्यानंतर शिवसेना पक्षाचे बळ अधिकच वाढत गेले.

शिवसेना महाराष्ट्रात स्थिरस्थावर झाल्यानंतर पक्षाचा मुख्य उद्देश महाराष्ट्रात गैर मराठी लोकांच्या तुलनेत मराठी लोकांकरीता जास्त रोजगार निर्माण करणे हा होता. म्हणुन १९८९ साली शिवसेनेने सामना या वृत्तपत्राची निर्मीती केली.

राजनैतिक दृष्टया पाहता शिवसेना कुण्या एका समुदायाचा पक्ष नव्हता. त्यांनी मुंबईत भाजपा (भारतीय जनता पक्ष) सोबत युती केली.

१९९५ साली महाराष्ट्रातील निवडणुकांमध्ये भाजप आणि शिवसेनेचा मोठया मताधिक्याने विजय झाला.

आणि १९९५ ते १९९९ दरम्यान बाळासाहेब ठाकरेंनी स्वतःला ''रिमोट कण्ट्रोल'' मुख्यमंत्री घोषीत केले.

धर्माच्या नावावर मतं मागण्याचा आरोप ठेवत २८ जुलै १९९९ ला निवडणुक आयोगाने बाळासाहेबांच्या मतदानाच्या अधिकारावर ६ वर्षांपर्यंत प्रतिबंध लावला व ११ डिसेंबर १९९९ ते १०  डिसेंबर २००५ या ६ वर्षांदरम्यान कोणत्याही निवडणुकीत सहभागी होण्यावर देखील निर्बंध लावले.

निर्बंध हटवल्यानंतर पहिल्यांदा बाळासाहेबांनी मुंबई महानगरपालिकांच्या निवडणुकीत मतदान केले होते.

शिवसेना कायम मुंबईतील मराठी माणसाच्या पाठीशी उभी राहील अशी बाळासाहेब ठाकरेंची कायम घोषणा होती.

ते म्हणायचे जे लोक आमच्या धर्माच्या विरोधात आहेत त्यांना भारतातुन हाकलुन द्यायला हवे.

विशेषतः जेव्हां कुणी हिंदु धर्माच्या विरोधात वक्तव्य करतं तेव्हां त्याला चांगलेच प्रत्युत्तर द्यायला हवे.

ज्या काळात महाराष्ट्रात मोठया प्रमाणात बेराजगारी निर्माण झाली होती त्याच वेळी बाळासाहेबांनी महाराष्ट्राचा विकास करण्याकरीता धुरा हाती घेतली आणि महाराष्ट्रातील जनतेकरीता अनेक रोजगार उपलब्ध करून दिले.

         बाळासाहेबांचा मृत्यु –

१७ नोव्हेंबर २०१२ रोजी अचानक आलेल्या हृदय विकाराच्या तिव्र धक्क्याने बाळासाहेब ठाकरेंचे निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी वाऱ्यासारखी पसरताच ऐरवी वेगाने धावणारी मुंबई क्षणात स्तब्ध झाली.

पुर्ण मुंबईकरांनी स्वयंस्फुर्तीने आपापली प्रतिष्ठाने बंद केली. संपुर्ण महाराष्ट्रात हाय अलर्ट जारी करण्यात आला.

महाराष्ट्र पोलिसांनी संपुर्ण महाराष्ट्रात २०००० पोलिस आणि १५ रिझर्व पोलिसांच्या तुकडीला शांतता स्थापित करण्याकरता तैनात केले होते.

बाळासाहेबांच्या प्रती जनतेचे प्रेम पाहाता त्यावेळेचे भारताचे प्रधानमंत्री मनमोहन सिंह यांनी जनतेला शांतता राखण्याचे आवाहन केले. गुजरात चे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी देखील बाळासाहेबांच्या प्रती आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या.

१८ नोव्हेंबर २०१२ ला बाळासाहेबांच्या पार्थिवाला शिवाजी पार्कला नेण्यात आले.

त्यांच्या अंत्यसंस्कार शिवाजी पार्क येथे करण्यात आला. याच ठिकाणी शिवसेनेने आपले अनेक अभियान यशस्वी केले होते.

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या नंतर सार्वजनीक ठिकाणी हे पहिले अंत्यसंस्कार होते. लाखो लोकांचा जनसमुदाय या समयी शिवाजीपार्क येथे जमला होता.

वृत्तपत्रांच्या बातम्यांनुसार त्यावेळी उपस्थित लोकांची संख्या जवळपास दिड ते दोन लाख होती.

त्यांच्या अंत्यसंस्काराचे वृत्त त्यावेळी सगळयाच प्रसारमाध्यमांनी प्रसारीत केले होते.

लोकसभा आणि विधानसभेचे कोणत्याही प्रकारचे सदस्यत्व नसतांना देखील त्यांना एवढा सन्मान मिळाला.

कुठलीही कार्यालयीन पदवी नसतांना देखील त्यांना २१ तोफांची सलामी देण्यात आली. असा सन्मान फार कमी लोकांना देण्यात येतो.

बिहार मधील दोन्ही मुख्य सभागृहांमधे बाळासाहेबांना श्रध्दांजली देण्यात आली.

मराठी भाषेवर बाळासाहेबांचे नितांत प्रेम होते. मराठीला त्यांना उच्चस्थानावर पोहोचलेले पहायचे होते.

मराठी माणसांकरीता, त्यांच्या हक्काकरता त्यांनी अनेक आंदोलनं देखील केलीत.

रोजगाराच्या क्षेत्रात मराठी माणसाच्या आरक्षणाकरीता त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले होते.

महाराष्ट्रातील जनता त्यांना ''टायगर ऑफ मराठा'' म्हणुन ओळखायची.

ते पहिले असे व्यक्ति होते की त्यांच्या मृत्युच्या बातमीने लोकांनी कोणत्याही आदेशाविना स्वयंस्फुर्तीने बंद पाळला होता.

--Majhi Marathi
------------------

                      (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मIझी मराठी.कॉम)
                     -------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-17.11.2023-शुक्रवार.
=========================================

CHECK OUT MY SOCIALS -

INSTAGRAM - https://instagram.com/atul_chya_kavita
PINTEREST - https://www.pinterest.com/chyakavitaatul55/
TWITTER(X)- https://twitter.com/AtulChyaKavita
YOUTUBE   - https://www.youtube.com/@atulchyakavita4928/videos
FACEBOOK  - https://www.facebook.com/atulchyakavita
=========================================