हिंदहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे पुण्यतिथी-स्टेटस-1

Started by Atul Kaviraje, November 17, 2023, 09:30:24 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                         "हिंदहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे पुण्यतिथी"
                        ----------------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक १७.११.२०२३-शुक्रवार आहे. आज "हिंदहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे" यांची पुण्यतिथी आहे. बाळ केशव ठाकरे यांनी महाराष्ट्रात भूमिपुत्रांना न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेना पक्षाची स्थापना केली. व्यंगचित्रकार ते पक्षप्रमुख असा प्रवास करणार्‍या बाळ ठाकरेंना कोणतीही सक्रिय राजकारणाची पार्श्वभूमी नव्हती. वडीलांकडून प्रेरणा घेऊन त्यांनी महाराष्ट्रभर आपला करिष्मा तयार केला. यंदा त्यांची अकरावी पुण्यतिथी आहे. त्यांच्या पवित्र स्मृतींना वंदन करून, वाचूया काही स्टेटस--

     बाळ केशव ठाकरे ऊर्फ बाळासाहेब ठाकरे हे महाराष्ट्रातील शिवसेना पक्षाचे संस्थापक, राजकारणी तसेच व्यंगचित्रकार होते. सामना या मराठी दैनिकाचे ते संस्थापक आणि प्रमुख संपादकही होते. त्यांचा जन्म २३ जानेवारी १९२६ रोजी पुणे येथे झाला. सुरवातीला त्यांनी 'फ्री प्रेस जर्नल' मध्ये व्यंगचित्रकार म्हणून काम केले. पुढे १९६० मध्ये 'मार्मिक' हे स्वतःचे साप्ताहिक त्यांनी सुरू केले. १९ जून १९६६ मध्ये त्यांनी शिवसेना पक्षाची स्थापना केली.

     महाराष्ट्रात अनेक उद्योग असूनही मराठी माणूस बेरोजगार आणि गरीब आहे हे त्यांन जनतेला दाखवून दिले. त्या दिशेने काम करून अनेक मराठी माणसांना रोजगार उपलब्ध करून दिला. असंख्य गरजूंना मदत केली. प्रभावी व आक्रमक वकृत्व आणि रोखठोक भाषाशैली यामुळे ते विरोधकांना पळती भूई थोडी करत. १७ नोव्हेंबर २०१८ रोजी मुंबईतील मातोश्री या निवासस्थानी त्यांचे निधन झाले. #हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन !

=========================================
मनामनात उसळली जेव्हा मराठी अस्मितेची लाट..महाराष्ट्रात जन्मले तेव्हा माननीय हिंदुहृदयसम्राट  ..मराठीसाठी काढिले त्यांनी सामना है वृत्तपत्र.. मार्मिकपणे बोललं त्याच प्रत्येक व्यंगचित्र..ना द्वेष कैला कोणत्या धर्मावर वा जातीवर.. प्रेम केले सदैव त्यांनी आपुल्या मराठमोळ्या मातीवर..!हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन

सत्ता हाती नसतांनाही , दिल्ली पर्यंत दबदबा होता, पाण्यालाही पेटवणार , वत्कृत्वचा धबधबा होता, डोळ्यांमधून कोसळण्याची आसवांची आज मुभा आहे, कारण साहेब तुमच्या मुळेच मराठी माणूस अभिमानाने उभा आहे , हिंदहृदयसम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे. शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन.

"एका आवाजात मुंबई बंद पाडणारा वाघ होता तो,, "दिल्लीच्या गादीला ही घाम फुटेल असा छावा होता तो,, आज महाराष्ट्राला खरी गरज या माणसाची आहे. बाळासाहेब म्हणायचे जिजाऊ ची शिकवन आम्हाला. शिवाजी महाराज जाणले आम्ही.

लाल दिव्याची गाडी कधीच न वापरून सुद्धा देशाच्या काना कोपन्यात एकच नाव गुंजलं ते म्हणजे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ॥जय महाराष्ट्र ।।हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन.

जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो... नुसते हे दोन वाक्य जरी ऐकलेतरी अंगावर शहारे आल्या शिवाय राहणार नाही ...हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन.

दुसयांच्या विचारांनी स्वतःचे विचार बिघडवू नका. आणि अविचार आणि सुविचाराच्या भानगडीत पडू नका पुष्कळदा अविचार हा सुविचार होतो आणि सुविचार हा अविचार बनतो. तुम्हाला जे पटेल तेच लोकांना सांगण्याचा प्रयत्न करा. पण तुम्हाला न पटलेली गोष्ट सुद्धा तुम्ही लोकांना पटवण्याचा प्रयत्न करता तेव्हा तुम्ही फसता. स्वतःचे स्वतंत्र विचार मांडा आणि तेच खरे करून दाखवा - बाळासाहेब ठाकरे . हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन.
========================================

--मराठी भाषण व सूत्रसंचालन
--------------------------

                       (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठीभाषण.कॉम)
                      ------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-17.11.2023-शुक्रवार.
=========================================

CHECK OUT MY SOCIALS -

INSTAGRAM - https://instagram.com/atul_chya_kavita
PINTEREST - https://www.pinterest.com/chyakavitaatul55/
TWITTER(X)- https://twitter.com/AtulChyaKavita
YOUTUBE   - https://www.youtube.com/@atulchyakavita4928/videos
FACEBOOK  - https://www.facebook.com/atulchyakavita
=========================================