रीसेंट विसिटर (Recent Visitor)

Started by Rahul Kumbhar, November 14, 2010, 04:21:55 PM

Previous topic - Next topic

Rahul Kumbhar

त्या दिवशी सकाळी सकाळीच mail वर,
एक unread message वाट पाहत बसलेला
आणी होता त्याच्यासोबत एक चिडका smiley रूसलेला..

"इतका कसला busy असतो, mail ला सुद्धा reply नसतो..
माहितेये, invisible होऊन pc समोरच पडीक असतो...

इथून पुढे तुला कधी बोलणार नाही
chat काय, पण साधे ping सुद्धा करणार नाही...."

असा message टाकून ती होती चिडून निघून गेलेली
शेवटची ओळ मुद्दामच, not yours अशी लिहिलेली

तेव्हापासून सात आठ दिवस होता
orkut, facebook वर शुकशुकाट
twitter वर पण नव्हता तिचा पहिल्यासारखा चिवचिवाट
.
.
.
एखादा senti update टाकावा म्हणून परवा login केले
आणि समोरचे updates पाहून माझेच डोळे पांढरे झाले

recent visitors मध्ये तिचे नाव दिसले..
अन उदासलेले मन माझे मनोमन हसले

- राज (२६-१०-२०१०)



PRASAD NADKARNI




Prachi