चाहूल थंडीची

Started by शिवाजी सांगळे, November 18, 2023, 09:18:15 AM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

चाहूल थंडीची

लागता चाहूल थंडीची मन धुक्यात न्हाऊन जाते
रस्ते न् गल्लोगल्ली उब शेकोटीची जाणवू लागते

दिसती फिरून, घरोघरी उबदार वस्त्रे ठेवणीतली
चौकात स्वेटर मफलर शालींची रंगीत गर्दी दिसते

हलकेच ऋतू मनामनावर मग अद्भुत जादू करतो
गुंतले असो मन कैफात कोण्या तेही गुलाबी होते

अल्पावधी ठरते आयुष्य नेमके मलमली धुक्याचे
सहस्रश्मींनी हळूहळू जसे, नभांगण व्यापू लागते

फिरून एक नवे चक्र फिरते, सृष्टीचा नुर बदलतो
पानगळ सुरू होता हलके, शिशिराची चाहूल होते

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९