कविता मनातल्या-अपयशाचे खापर…

Started by Atul Kaviraje, November 18, 2023, 10:18:26 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                    "कविता मनातल्या"
                                   ------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया "कविता मनातल्या" या काव्य सदरI अंतर्गत, जीवनावर एक कविता. या कवितेचे शीर्षक आहे- "अपयशाचे खापर..."

                                  "अपयशाचे खापर..."
                                 -------------------

अपयशाचे खापर
माझ्यावरच फुटले
पडल्यानंतर उठण्याचे
बळच नव्हते राहिले

मिरवलेले स्वप्न माझे
जेंव्हा हरवले होते
प्रयत्नांचे तुकडे सारे
विखुरले होते
निराशाच्या ढगांनी
मनाला घेरले होते
जगण्याचे मार्ग सारे
धुसर झाले होते

माझ्यातल्या 'म' ला
मीच हवा दिली
विश्वासाने उमेदीची
नवी ज्योत पेटवली
निर्धाराने निष्ठेने
नवी आशा मला दिली
पडल्यानंतर उठण्याची
एक दिशा मला दिली

आशेच्या किरणांनी
नवे ऊन मला दाखवले
अपयशाचे दूःख सारे
तेंव्हा सुकून गेले
उमेदीने हात तिचे
पुढे सरसावले
आणि प्रयत्नांचे तुकडे
पुन्हा जुळले

अनुभवाने आता मी
खूप काही शिकलो
यशाला आता मी
वारंवार शिवतो
अपयशाचे खापर मी
माझ्यावरच फोडतो
जमीनीवर पाय ठेवून
ताठ मानेने जगतो.

--डौ. सुभाष कटकदौंड
---------------------

            (साभार आणि सौजन्य-संदर्भ मराठी कविता मनातल्या.वर्डप्रेस.कॉम)
           -----------------------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-18.11.2023-शनिवार.
=========================================

CHECK OUT MY SOCIALS -

INSTAGRAM - https://instagram.com/atul_chya_kavita
PINTEREST - https://www.pinterest.com/chyakavitaatul55/
TWITTER(X)- https://twitter.com/AtulChyaKavita
YOUTUBE   - https://www.youtube.com/@atulchyakavita4928/videos
FACEBOOK  - https://www.facebook.com/atulchyakavita
=========================================