१९-नोव्हेंबर-दिनविशेष

Started by Atul Kaviraje, November 19, 2023, 10:11:32 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१९.११.२०२३-रविवार. जाणून घेऊया,आजच्या दिवसाचे "दिन-विशेष"

                                 "१९-नोव्हेंबर-दिनविशेष"
                                ----------------------

-: दिनविशेष :-
१९ नोव्हेंबर
राष्ट्रीय एकात्मता दिन
आंतरराष्ट्रीय पुरुष दिन
World Toilet Day
=========================================
अ) महत्त्वाच्या घटना:
   ----------------
२०००
शांतता, निशस्त्रीकरण आणि विकास यासाठी दिला जाणारा 'इंदिरा गांधी पुरस्कार' राष्ट्रपती डॉ. के. आर. नारायणन यांच्या हस्ते कृषीशास्त्रज्ञ डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांना प्रदान
१९९९
शांतता, निशस्त्रीकरण आणि विकास यासाठी दिला जाणारा 'इंदिरा गांधी पुरस्कार' राष्ट्रपती डॉ. के. आर. नारायणन यांच्या हस्ते ढाक्क्याचे डॉ. मोहम्मद युनूस यांना देण्यात आला.
१९९८
सेल्फ पोर्ट्रेट विदाउट बेअर्ड
व्हिन्सेंट व्हॅन गॉगचे 'सेल्फ पोर्ट्रेट विदाउट बेअर्ड' हे चित्र ७.१५ कोटी डॉलर्सना विकले गेले. हे त्यांनी काढलेले शेवटचे सेल्फ पोर्ट्रेट असावे असा अंदाज आहे.
१९९८
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांच्यावर महाभियोग चालू.
१९६९
फूटबॉलपटू पेलेने आपला (कथित) १,००० वा गोल केला.
१९६९
'अपोलो-१२' या अमेरिकन अंतराळयानातुन चार्ल्स कॉनराड आणि अ‍ॅलन बिल हे चंद्रावर उतरले.
१९६०
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाची स्थापना
१९४६
अफगणिस्तान, आइसलँड आणि स्वीडनचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश
=========================================
ब) जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  -----------------------------
१९७५
सुश्मिता सेन – अभिनेत्री व मॉडेल, मिस युनिव्हर्स-१९९४
१९५१
झीनत अमान – अभिनेत्री, मिस एशिया-पॅसिफिक-१९७०
१९२८
दारा सिंग – मुष्टीयोद्धा आणि अभिनेता
(मृत्यू: १२ जुलै २०१२)
१९२२
सलील चौधरी
सलील चौधरी – हिंदी व बंगाली चित्रपटसृष्टीतील संगीतकार
(मृत्यू: ५ सप्टेंबर १९९५ - मुंबई)
१९१७
इंदिरा गांधी
इंदिरा गांधी – भारताच्या ३ र्‍या पंतप्रधान
(मृत्यू: ३१ आक्टोबर १९८४)
१९१४
एकनाथजी रामकृष्ण रानडे – क्रांतिकारक, स्वातंत्र्यसैनिक व कन्याकुमारी येथील विवेकानंद स्मारकाचे शिल्पकार. अधिकाधिक लोकांचा सहभाग असावा म्हणून मोठमोठ्या देणग्या जमा न करता एक एक रुपया जमा करुन त्यांनी विवेकानंद शिला स्मारकाचे प्रचंड काम उभे केले आहे.
(मृत्यू: २२ ऑगस्ट १९८२)
१९०९
पीटर ड्रकर – ऑस्ट्रियन अमेरिकन व्यवस्थापन तज्ञ, लेखक
(मृत्यू: ११ नोव्हेंबर २००५)
१८९७
सदाशिव आत्माराम जोगळेकर – लेखक व संपादक. अहिल्या आणि इतर कथा, घारापुरी (१९४८), संयुक्त महाराष्ट्राचा ज्ञानकोश, सुलभ विश्वकोश ही त्यांची काही पुस्तके आहेत.
(मृत्यू: २९ जानेवारी १९६३)
१८८८
जोस रॉल कॅपाब्लांका – क्यूबाचा बुद्धीबळपटू
(मृत्यू: ८ मार्च १९४२)
१८७५
देवदत्त रामकृष्ण भांडारकर – प्राच्यविद्या संशोधक, प्राचीन भारतीय इतिहासाचे व संस्कतीचे अभ्यासक आणि पुरातत्त्वज्ञ, विदीशाजवळील वीसनगर येथील उत्खनन आणि त्यात सापडलेला 'खांब बाबा पिलर' हा स्तंभ हे त्यांचे एक प्रमुख संशोधन
(मृत्यू: १३ मे १९५०)
१८३८
केशव चंद्र सेन – ब्राम्हो समाजातील एक थोर पुरूष, समाजसुधारक आणि लोकसेवक
(मृत्यू: ८ जानेवारी १८८४)
१८३१
जेम्स गारफील्ड – अमेरिकेचे २० वे राष्ट्राध्यक्ष
(मृत्यू: १९ सप्टेंबर १८८१)
१८२८
मणिकर्णिका तांबे ऊर्फ 'राणी लक्ष्मीबाई' – झाशीची राणी
(मृत्यू: १८ जून १८५८)
=========================================
क) मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
    -------------------------
२०१७
याना नोव्होत्‍ना
याना नोव्होत्‍ना – झेक लॉन टेनिस खेळाडू, १९९८ ची विम्बल्डन विजेती
(जन्म: १ ऑक्टोबर १९६८)
१९९९
रामदास कृष्ण धोंगडे – कीर्तनकार व प्रवचनकार, ज्ञानेश्वरीचे अभ्यासक
(जन्म: ????)
१९७१
कॅप्टन गो. गं. लिमये – मराठी लघुकथेचे प्रवर्तक व विनोदी लेखक, मुंबईत आरोग्याधिकारी असताना हिवतापाला कारणीभूत होणार्‍या डासांवर अभ्यास करुन त्यांनी 'डास तो काय?' अशा पुस्तकांची मालिका लिहिली होती.
(जन्म: ? ? ????)
१८८३
सर कार्ल विल्हेम सिमेन्स – जर्मन/ब्रिटिश विद्युत अभियंता, अभियांत्रिकी क्षेत्रात काम करणारी 'सिमेन्स' ही बलाढ्य कंपनी त्याच्याच भावाने स्थापन केली आहे.
(जन्म: ४ एप्रिल १८२३)
=========================================

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-19.11.2023-रविवार.
=========================================

CHECK OUT MY SOCIALS -

INSTAGRAM - https://instagram.com/atul_chya_kavita
PINTEREST - https://www.pinterest.com/chyakavitaatul55/
TWITTER(X)- https://twitter.com/AtulChyaKavita
YOUTUBE   - https://www.youtube.com/@atulchyakavita4928/videos
FACEBOOK  - https://www.facebook.com/atulchyakavita
=========================================