दिन-विशेष-लेख-राष्ट्रीय एकात्मता दिन

Started by Atul Kaviraje, November 19, 2023, 09:50:16 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                   "दिन-विशेष-लेख"
                                "राष्ट्रीय एकात्मता दिन"
                               ---------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-19.11.2023-रविवार आहे.  १९-नोव्हेंबर, हा दिवस "राष्ट्रीय एकात्मता दिन" म्हणूनही ओळखला जातो. वाचूया, तर या दिवसाचे महत्त्व, आजच्या या "दिन-विशेष-लेख" या शीर्षकI-अंतर्गत.

     आजच्या या लेखात, मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे राष्ट्रीय एकात्मता मराठी निबंध (national unity essay in Marathi). राष्ट्रीय एकात्मता या विषयावर लिहलेला हा मराठी माहिती निबंध लेख मुलांसाठी आणि सर्व वर्गांसाठी अगदी पहिली पासून ते महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी उपयोगी आहे.

     तुम्ही तुमच्या शाळा किंवा महाविद्यालयीन प्रकल्पासाठी राष्ट्रीय एकात्मता मराठी निबंध (national unity essay in Marathi) वापरू शकता. आमच्या या वेबसाइटवर इतर सुद्धा अनेक विषयांवर मराठीमध्ये निबंध उपलब्ध आहे, ते सुद्धा आपण आपण वाचू शकता.

          राष्ट्रीय एकात्मता मराठी निबंध--

     भारतात अनेक धर्म, जाती आणि भाषांचे लोक राहतात. विविधतेत एकता हे भारताचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. राष्ट्रीय एकात्मता म्हणजे देशात एकत्र राहणारे सर्व धर्म, जाती, भाषा यांचे लोक.

             परिचय--

     देशाची एकात्मता टिकवून ठेवण्यासाठी देशातील कोणताही नागरिक त्याच्या आवडीचा कोणताही धर्म स्वीकारू शकतो, असा अधिकार भारतीय राज्यघटनेने बहाल केला आहे. प्रत्येकाला आपल्या धर्माचे पालन करण्याचे स्वातंत्र्य आहे.

            राष्ट्रीय एकात्मता म्हणजे काय--

     राष्ट्रीय एकात्मता म्हणजे देशाची आर्थिक, सामाजिक, राजकीय आणि वैचारिक एकता. कर्म, कर्मकांड, पूजा, भोजन, राहणीमान आणि वेशभूषा यामध्ये फरक असू शकतो. त्यात अनेक विचाराचे लोक असतील पण राजकीय आणि वैचारिक दृष्टीने ऐक्य आहे.

     एकता हा भावनिक शब्द आहे ज्याचा अर्थ एक असण्याची भावना आहे. एकात्मतेचा खरा अर्थ हा आहे की देश सामाजिक, सांस्कृतिक, भौगोलिक आणि साहित्यिक दृष्टीने एकसंध आहे.

            राष्ट्रीय एकात्मतेची गरज--

     देशाची अंतर्गत शक्ती आणि सुव्यवस्था आणि बाह्य सुरक्षेच्या दृष्टिकोनातून राष्ट्रीय एकात्मता ही नितांत गरज आहे. जेव्हा आपण असंघटित असतो तेव्हा आपल्याला त्याची आर्थिक आणि राजकीय किंमत मोजावी लागते. त्यामुळे देशाच्या स्वातंत्र्यासाठी आणि राष्ट्राच्या प्रगतीसाठी राष्ट्राची एकात्मता नितांत आवश्यक आहे.

            राष्ट्रीय एकात्मतेच्या मार्गातील महत्वाच्या अडचणी--

     राष्ट्रीय एकात्मतेचा अर्थ असा नाही की आपण एका राष्ट्राचे आहोत. राष्ट्रीय एकात्मतेसाठी एकमेकांप्रती बंधुभावाची भावना असणे आवश्यक आहे.

--by Marathi Social
----------------------

                      (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी सोशल.कॉम)
                     --------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-19.11.2023-रविवार.
=========================================

CHECK OUT MY SOCIALS -

INSTAGRAM - https://instagram.com/atul_chya_kavita
PINTEREST - https://www.pinterest.com/chyakavitaatul55/
TWITTER(X)- https://twitter.com/AtulChyaKavita
YOUTUBE   - https://www.youtube.com/@atulchyakavita4928/videos
FACEBOOK  - https://www.facebook.com/atulchyakavita
=========================================