दिन-विशेष-लेख-संस्कृती एकता दिन-A

Started by Atul Kaviraje, November 23, 2023, 08:22:00 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                    "दिन-विशेष-लेख"
                                  "संस्कृती एकता दिन"
                                ---------------------

मित्र/मैत्रिणींनो,

          आज दिनांक-23.11.2023-गुरुवार आहे. २३-नोव्हेंबर, हा दिवस "संस्कृती एकता दिन" म्हणूनही ओळखला जातो. वाचूया, तर या दिवसाचे महत्त्व, आजच्या या "दिन-विशेष-लेख" या शीर्षकI-अंतर्गत.

     संस्कृती या संस्कृत शब्दाचा अर्थ 'चांगले करणे' असा होतो. धर्मासह समग्र अंतर्बाह्य जीवनाच्या उन्नत अवस्थेसाठी संस्कृती हा शब्द वापरला जातो. प्रकृती म्हणजे निसर्ग, विकृती म्हणजे निसर्गात होणारा विकार आणि संस्कृती म्हणजे प्रकृतीत विकार होऊ नये म्हणून त्यावर करायचा संस्कार.

       संस्कृती ही विविध अर्थच्छटा असणारी संकल्पना आहे. हा शब्द सहसा खालीलपैकी एखादा अर्थ ध्वनित करण्यासाठी योजला जातो :--

     कला व शास्त्रे यांतील उच्च अभिरुची - अर्थात 'अभिजात संस्कृती', एखाद्या संस्थेच्या / संघटनेच्या किंवा एखाद्या समूहाच्या प्रवृत्ती, मूल्ये, ध्येये, प्रथा-प्रघात इत्यादी सामायिक बाबी, मानवी ज्ञान, समजुती, वर्तणुक इत्यादींचा एकत्रित परिपाक.

          आशय--

     मनुष्य व त्याच्या भोवतीचे विश्व मिळून निसर्ग बनतो. या निसर्गामध्ये जीवनाच्या उत्कर्षाला अनुकूल असे बदल करून म्हणजेच निसर्गावर काही संस्कार करून मनुष्य आपली जीवनयात्रा चालवितो. तो केवळ बाह्य विश्वातील पदार्थांवर संस्कार करतो असे नव्हे, तर स्वतःचा देह, मन आणि बुद्धी यांच्यावरही संस्कार करून स्वतःत बदल घडवून आणतो. संस्कृती या शब्दात हे दोन्ही प्रकारचे बदल अभिप्रेत आहेत.

            संस्कृतीची रूपे--

     संस्कृतीची दोन रूपे असतात, एक डोळ्याला जाणवणारे व दुसरे ज्ञानेंद्रियांद्वारे जाणवणारे. याविषयी इरावती कर्वे यांनी नोंदविले आहे- "व्यक्ती या घरे,कपडे इ.स्थूल वस्तूंचा उपभोग घेत असतात. हे संस्कृतीचे बाह्य रूप. संस्कृतीचे दुसरे रूप म्हणजे माणसाने सामाजिक जीवन जगण्यासाठी ठरवून घेतलेली रीत होय. योग्य-अयोग्य ,पाप-पुण्य, इत्यादी.संकल्पना तसेच कौटुंबिक नाती, वागणूक इत्यादी.गोष्टी या परंपरागत असतात. या गोष्टी माणूस एकटा निर्माण करीत नाही, तो समूहाने त्या करत असतो.

           वाचन संस्कृती-बदलता वाचनव्यवहार :-

     टी.व्ही, रेडिओ ,इंटरनेट, फेसबुक, व्हॉट्‌सॲप, ट्विटर यांसारख्या आधुनिक प्रसारमाध्यमाच्या उपलब्धतेचा साहित्यव्यवहार आणि वाचनसंस्कृतीवर जाणवण्याइतपत परिणाम झाल्याचे दिसते. आधुनिक वाचकवर्ग या प्रसारमाध्यमाच्या विळख्यात सापडल्याने वाचन संस्कृतीवर काय चांगले वाईट परिणाम झाले हे बघणे गरजेचे आहे. सध्या वाचनव्यवहार लोप पावत चालला आहे, लोक वाचत नाहीत. मराठी पुस्तकांना पहिल्यासारखा वाचक मिळत नाही . असा काहीसा ओरडा साहित्य व्यवहारात होताना दिसतो आहे. आधुनिक प्रसारमाध्यमांच्या प्रभावांमुळे पुस्तकांचा वाचक वर्ग दुरावला आहे. ओरडा विचारवंत, प्रकाशक, लेखक, पत्रकार मंडळींनी जो केला आहे. त्या ओरडण्यात कितपथ तथ्य आहे हे बघणे महत्त्वाचे आहे.

     पूर्वीचा काळ असा होता की, पुस्तकाचे वाचन करणे, संग्रह करणे हे वैचारिक श्रीमंतीचे एक लक्षण समजले जाई. पुस्तकाचे आदान प्रदान केले जाई .कोणी कोणती पुस्तके वाचली, त्यांतून काय मिळाले, याविषयी आपसात चर्चा-वादविवाद व्हायचे. चांगल्या कथा‍- कादंबऱ्या या वाचताना वाचक एका भावनिक स्थितीत हरवला जायचा. काव्य, कथा, नाट्य, प्रवासवर्णन, ललित, वैचारिक गद्य यांच्या वाचनाने रसिक वाचक आणखी समृद्ध होत जायचा. विविध ग्रंथप्रकाशने, नियतकालिके, मासिके, वृत्तपत्राच्या रविवारच्या अंकातील साहित्यिक पुरवण्या यांवर वाचकांच्या अक्षरशः उड्या पडायच्या. एखाद्या चांगल्या पुस्तकाच्या सर्व आवृत्या रांगा लावून हातोहात खपल्या जायच्या असा तो वैभवाचा काळ.बघता बघता हा वाचनसंस्कृतीच्या वैभवाचा काळ लोप पावला .टी.व्ही, रेडिओ, इंटरनेट, डीव्हीडी, व्हीसीडी प्लेअर, सोशल मेडिया, फ़ेसबुक, व्हॉट्‌सॲप, ट्विटर, इन्स्टाग्रॅम यांसारख्या आधुनिक करमणुकीच्या प्रसारमाध्यमांच्या वाढत्या प्रभावामुळे वाचक पुस्तके वाचेनासा झाला. रांगा लाऊन विकली जाणारी पुस्तके सवलत देऊनही विकली जात नसल्याच्या प्रकाशकांच्या ओरडण्यात तथ्य असल्याचे दिसते.

                           (साभार आणि सौजन्य-संदर्भ-विकिपीडिया.ऑर्ग)
                        ------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-23.11.2023-गुरुवार.
=========================================

CHECK OUT MY SOCIALS -

INSTAGRAM - https://instagram.com/atul_chya_kavita
PINTEREST - https://www.pinterest.com/chyakavitaatul55/
TWITTER(X)- https://twitter.com/AtulChyaKavita
YOUTUBE   - https://www.youtube.com/@atulchyakavita4928/videos
FACEBOOK  - https://www.facebook.com/atulchyakavita
=========================================