संकष्टी चतुर्थी-लेख

Started by Atul Kaviraje, November 30, 2023, 02:57:31 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                       "संकष्टी चतुर्थी"
                                     ---------------- 

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-३०.११.२०२३-गुरुवार आहे. आज गणपती बाप्पाची "संकष्टी चतुर्थी" आहे. श्री गणेशाची आरती करून, त्याच्या चरणांचे पावन तीर्थ घेऊया, आणि वाचूया, संकष्टी चतुर्थी वर एक लेख--

          Happy Sankashti Chaturthi--

     या महिन्याची संकष्टी चतुर्थी 30 नोव्हेंबर रोजी म्हणजेच आज साजरी होत आहे. संकष्टी चतुर्थी म्हणजे संकटाचा पराभव करणारी चतुर्थी. या दिवशी गणपतीची पूजा केल्याने सर्व प्रकारच्या दुःखांपासून मुक्ती मिळते. चतुर्थीच्या दिवशी गौरीपुत्र गणेशाची पूजा करणे फार फलदायी असते.

     30 नोव्हेंबरच्या संकष्टी चतुर्थी दिवशी पहा चंद्रोदयाच्या वेळा काय? संकष्टी चतुर्थी दिवशी रात्री चंद्रोदयाची वेळ पाहून त्यानंतर व्रताची सांगता केली जाते. त्यामुळे पहा संकष्टीच्या चंद्रोदयाच्या वेळा काय?
   
        Sankashta Chaturthi November 2023 Moon Rise Time: 30 नोव्हेंबरच्या संकष्टी चतुर्थी दिवशी पहा चंद्रोदयाच्या वेळा काय?--

     नोव्हेंबर महिन्यामध्ये यंदा 2 संकष्टी चतुर्थी (Sankashta Chaturthi) आल्या आहे. 1  नोव्हेंबर नंतर आता महिना अखेरीस 30 नोव्हेंबरला देखील संकष्टी चतुर्थी येणार आहे. गणेश भक्तांंसाठी संकष्टी चतुर्थीचा दिवस खास असतो. या दिवशी अनेकजण मनातील इच्छा पूर्ण होवोत या अपेक्षेने गणपती बाप्पा कडे व्रत करतात. या व्रताची सांगता चंद्रोदयानंतर केली जात असल्याने तुमच्या शहरानुसार 30 नोव्हेंबर  दिवशी महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांमध्ये, गावामध्ये कोणत्या वेळी चंद्रोदय होणार आहे हे देखील नक्की जाणून घ्या.

     हिंदू पंचांगानुसार कृष्ण पक्षात येणार्‍या चतुर्थीस संकष्ट चतुर्थी किंवा संकष्टी चतुर्थी म्हणतात. एका वर्षात 12 आणि त्यावर्षी अधिकमास आल्यास 13 संकष्टी चतुर्थी येतात. यंदा श्रावण महिन्यात अधिक मास आला होता. त्यामुळे 13 संकष्टी चतुर्थी देखील साजरा करण्यात येत आहेत. संकष्टी चतुर्थी निमित्त ग्रीटिंग्स, SMS, Messages, GIFs, Images, WhatsApp Status च्या माध्यमातून द्या मंगलमयी शुभेच्छा! )

         महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहरातील चंद्रोदयाच्या वेळा--

मुंबई  8.35 रात्री

पुणे  8.35  रात्री

नाशिक  8.31   रात्री

नागपूर  8.07  रात्री

औरंगाबाद 8.23 रात्री

     संकष्टी चतुर्थी च्या दिवशी गणरायाची विधिवत पूजा केली जाते. बाप्पाला दूर्वा, फूलं अर्पण केली जातात. नैवेद्याला उकडीचे मोदक बनवले जातात. गणेश मंदिरामध्ये जाऊन देखील अनेक भाविक बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी गर्दी करत असतात. नियमित संकष्टीचा उपवास करणारी मंडळी बाप्पाची घरी देखील या दिवशी साग्रसंगीत पूजा करतात. उपवासाच्या जेवणात कांदा-लसूण विरहित जेवणाचा समावेश करतात.

     भगवान गणेश ही बुद्धिमत्ता, शक्ती आणि बुद्धीची देवता आहे. तो आपल्या भक्तांच्या सर्व अडचणी आणि अडथळे दूर करतो.

     हिंदू धर्मात कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी गणेशाची पूजा केली जाते. सर्व देवी-देवतांमध्ये पूजल्या जाणार्‍या गणपतीला पहिले मानले जाते. देवी-देवतांना प्रसन्न करण्यासाठी अनेक उपवास केले जातात. यापैकी श्रीगणेशासाठी संकष्टी चतुर्थी व्रत खूप लोकप्रिय आहे. चतुर्थी महिन्यातून दोनदा येते.  संकष्टी चतुर्थीचे व्रत केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात. अशी लोकांची धारणा आहे.

             गणपतीची पूजा करण्याचा विशेष दिवस--

     संकष्टी चतुर्थी हा गणपतीची पूजा करण्याचा विशेष दिवस मानला जातो. या महिन्याची संकष्टी चतुर्थी 30 नोव्हेंबर रोजी म्हणजेच आज साजरी होत आहे. संकष्टी चतुर्थी म्हणजे संकटाचा पराभव करणारी चतुर्थी. या दिवशी गणपतीची पूजा केल्याने सर्व प्रकारच्या दुःखांपासून मुक्ती मिळते. चतुर्थीच्या दिवशी गौरीपुत्र गणेशाची पूजा करणे फार फलदायी असते. या दिवशी सूर्योदयापासून चंद्रोदयापर्यंत उपवास केला जातो.

              संकष्टी चतुर्थीसाठी पूजा मुहूर्त--

     हिंदू पंचांगानुसार, मार्गशीर्ष महिन्याच्या कृष्ण पक्षाची चतुर्थी तिथी गुरुवार, 30 नोव्हेंबर रोजी दुपारी 2.24 पासून सुरू होईल, ती शुक्रवार 1 डिसेंबर रोजी दुपारी 3.31 वाजता समाप्त होईल. उदयतिथीच्या आधारे संकष्टी चतुर्थीचे व्रत 30 नोव्हेंबरला केले जाईल, कारण चतुर्थी तिथीचा चंद्रोदय ३० नोव्हेंबरलाच होत आहे. संकष्टी चतुर्थीला सकाळी पूजा केली जाईल. त्यावेळी शुभ योग राहील. त्या दिवशीचा शुभ मुहूर्त सकाळी 06.55 ते 08.14 पर्यंत आहे. लाभ-उन्नती मुहूर्त दुपारी 12.10 ते 01.28 पर्यंत आणि अमृत-सर्वोत्तम मुहूर्त दुपारी 01.28 ते 02.47 पर्यंत आहे.

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-30.11.2023-गुरुवार.
========================================

CHECK OUT MY SOCIALS -

INSTAGRAM - https://instagram.com/atul_chya_kavita
PINTEREST - https://www.pinterest.com/chyakavitaatul55/
TWITTER(X)- https://twitter.com/AtulChyaKavita
YOUTUBE   - https://www.youtube.com/@atulchyakavita4928/videos
FACEBOOK  - https://www.facebook.com/atulchyakavita
========================================