आकाश

Started by mkapale, December 03, 2023, 09:15:40 AM

Previous topic - Next topic

mkapale

आकाश

काळवंडलेलं आकाश घाबरवतंय का
धुकं रहस्यमय करून जातं सगळं

एक किरण येतो आणि सांगतो थांब मना
छोट्याश्या काळोखाने आयुष्य का वाटतंय वेगळं?

आकाश आपल्याला आयुष्याचं चित्र दाखवतं
कधी जमिनीला भेटतं आपल्या माणसांसारखं

विजा आणि ढगांचा गोंधळ जसं विस्कटलेलं जीवन
कधी निळं निरभ्र जसं छान सजवलेल्या घरासारखं

रंगांची उधळण पाहत , वाटतं असच जगत राहावं
हवाहवासा पाऊस येतो खूप हसू उधळल्यासारखं

आकाश आपल्याकडे पाहत असतं कि आपण त्याकडे
एक नक्की कि कधी वाटतं ते आपल्याशी बोलल्यासारखं

उंच केली मान तरच ते दिसतं
वाकू नकोस , स्वप्न बघत रहा सांगत असतं

ऊन वारा पाऊस आणि बरंच काही येईल सोबत
पाहिलं त्याकडे कि ते नेहेमीच उमेद देत असतं